अहमदनगर

माळवाडगाव येथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्साहात साजरी

श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : माळवाडगाव येथील जगदंबा युवा प्रतिष्ठान व धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौक मित्र मंडळाच्या वतीने धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

माळवाडगाव येथील धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौक येथे माजी ग्रामपंचायत सदस्य रावसाहेब काळे यांच्या हस्ते आणि दिलीपराव हुरुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सर्वप्रथम धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची आरती करण्यात आली.

आजच्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा आदर्श आजच्या तरुणांनी आत्मसात करून महाराजांचे हिंदवी स्वराज्याचे स्वप्न साकार करण्यासाठी प्रयत्न करावे तसेच महाराजांचे जीवन चरित्र आत्मसात करून आचरणात आणावे असे आवाहन माळवाडगाव ग्रामपंचायतीचे माजी सदस्य रावसाहेब काळे यांनी केले.

यावेळी कैलास आसने, सुभाष आसने, रावसाहेब आसने, जगदंबा युवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष संदीप आसने, जगदंबा युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष सतीश आसने, उपाध्यक्ष अतिश आसने, सचिव प्रदीप आसने कार्यकारिणी सदस्य अमोल मोरे, प्रमोद आसने, महेश आसने, सोहेल पठाण, अरबाज पठाण, तेजस आसने, सार्थक सोमकुवर, अर्णव आसने, भैया दादासाहेब आसने आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सतीश आसने यांनी केले तर उपस्थितांचे अतीश आसने यांनी आभार व्यक्त केले.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button