अहमदनगर

‘आई’ म्हणजे आत्म्याचा ईश्वर, ज्याला कळाले तो भाग्यवानच – डॉ. बाबुराव उपाध्ये

श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : भारतीय संस्कृती ही ‘मातृपितृ देवोभव’ मानणारी आहे. ‘आई’ म्हणजे आत्म्याचा ईश्वर हे ज्याला कळाले तो खरा भाग्यवानच होय, असे विचार रयत शिक्षण संस्थेचे माजी मॅनेजिंग कौन्सिल सदस्य, जेष्ठ ग्रामीण साहित्यिक डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी व्यक्त केले.

श्रीरामपूर येथील इंदिरानगरमधील फकिरा वाघमारे यांनी आयोजित केलेल्या ‘मातृदिन सन्मान’ सोहळ्या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. उपाध्ये बोलत होते. फकिरा वाघमारे यांनी स्वागत, प्रास्ताविक करताना सांगितले की, आपली आई दररोज आपल्या जवळ असते. तिची चोवीस तास आपण काळजी घेतो, सेवा करतो.

आज काही तरुण जोडपे आई, वडिलांना सोडून जातात, वृद्धाश्रमात ठेवतात, दुर्लक्ष करतात पण ‘आई’ आमच्या घर मंदिरात आहे, त्यामुळे घर घरासारखे वाटते. आईची सेवा व सहवास हा सर्वात अनुभवी विचारांचा खजिना आणि पुण्यमयी जाणिवेचा ठेवा असतो. तो जपला पाहिजे असे त्यांनी सांगितले.

डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी आईचे अस्तित्व म्हणजे निर्मिकाची जवळीक होय, ती सर्वांनी जपली पाहिजे. आई नसल्यावर काय होते, ते मी अनुभवले असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी जमलेल्या मातेचे पूजन करण्यात आले. डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी संपादित केलेल्या ‘मातृपितृ देवोभव’ या पुस्तकावर चर्चा करण्यात आली. सर्व मातांना पुस्तके देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.

यावेळी श्रीमती सुलाबाई वाघमारे, सौ. जिजाबाई निकाळे, सौ. शकुंतला कोळसे, श्रीमती झुंबरबाई पठारे, सौ. वत्सला पठारे, सौ.मंदाकिनी उपाध्ये, सौ. सुनंदा वाघमारे, सौ. चंद्रकला तुपे, श्रीमती मालन मोहन, सौ. विद्या पठारे, श्रीमती गवारे, सौ. सोनाली भडांगे, सौ. ज्योती जगताप, सौ. संध्या जाधव, आदिंचा सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमाचे आशिष वाघमारे, प्रसाद वाघमारे, चैतन्य वाघमारे, शैलेश निकाळे, रवींद्र पठारे, पवन शेजवळ, सम्यक निकाळे, शर्विन निकाळे आदिंनी नियोजन केले. सच्चिदानंद तुपे, दगडू सखाराम निकाळे, सौ. सुनंदा वाघमारे, श्रीमती मालन मोहन आदिंनी मनोगत व्यक्त केले. सौ. मंदाकिनी उपाध्ये यांनी आभार मानले.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button