अहमदनगर
रेल्वे दुहेरीकरण व विजेचे खांब उभारणीस सुरुवात
श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : येथील इंदिरानगर परीसराजवळ मध्य रेल्वेकडून बेलापूर स्टेशन हद्दीत रेल्वेचे दुहेरी रेल्वे लाईन टाकण्याचे काम जोरात चालू असून बाजूला विजेचे खांबसुद्धा रेल्वे विभागाकडून मशिनरी व्दारे जलदगतीने उभे करण्याचे काम सुरु आहे. अनेक वर्षापासून या दौंड मनमाड मार्गाकडे दुर्लक्ष झाले होते.
या मार्गावर लांब पल्ल्याच्या गाड्या धावत असतात. सिंगल लाईन असल्याने समोरून येणाऱ्या गाड्यांना जाऊ देण्यासाठी कोणत्या तरी स्टेशनवर बाजूला थांबून प्रवासास विलंब होत असे. आता विलंब होण्याची वेळ संपुष्टात आली आहे. या कामाला अजून महिना तरी प्रतीक्षा करावी लागणार आहे. सध्या मनमाड ते पढेगाव दुहेरीकरण प्रगतीपथावर आहे.