अहमदनगर

शासकीय विभागांनी शासकीय योजनांचा व्‍यापक स्‍वरुपात प्रचार-प्रसार करावा – उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील

नगर : शासकीय योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी योजनांचा प्रचार – प्रसार व्‍यापक स्‍वरुपात झाला पाहिजे. समाजातील तळागाळातील गरजु गरीब लोकांना योजनांचा लाभ मुदतीत मिळावा यासाठी तालुकास्‍तरीय विभागांनी प्रयत्‍न करणे आवश्‍यक आहे. असे मत अहमदनगरचे उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील यांनी व्‍यक्‍त केले.

“जत्रा शासकीय योजनांची, सर्वसामान्‍यांच्‍या विकासाची” याबाबत उपविभागीय कार्यालयाच्‍या सभागृहात आयोजीत तालुकास्‍तरीय आढावा बैठकीत मार्गदर्शन करताना ते बोलत होते. पुढे बोलताना पाटील म्हणाले की, जिल्‍ह्यात 15 एप्रिल ते 15 जुन 2023 या कालावधीत सदर अभियान राबविण्‍यात येणार आहे.

अभियान यशस्‍वी होण्‍याच्‍या दृष्‍टीने तालुक्‍यातील शासकीय विभागांनी आपल्‍या विभागाशी संबंधित शासकीय योजना तालुक्‍यातील जास्‍तीत-जास्‍त लाभार्थ्‍यांपर्यंत कशा पोहोचतील याचे नियोजन करुन या योजनेचा लाभ लाभार्थ्‍यांना करुन द्यावा. तसेच आपल्‍या कार्यालयात आलेल्‍या लाभार्थ्‍याला कुठलीही अडचण होणार नाही यासाठी कार्यालयात एका कर्मचा-याची अभियान कालावधीत नियुक्‍ती करावी, असे त्‍यांनी सांगितले.

या बैठकीत आरोग्‍य, पंचायत समिती, कृषी, सार्वजनिक बांधकाम विद्युत, सामाजिक वनीकरण, कौशल्‍य विकास आदी विभागांनी आपल्‍या विभागाशी संबंधित योजनांची माहिती व अभियान कालावधीतील नियोजनाबाबत बैठकीत माहिती सादर केली.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button