उपयुक्त माहिती

अहमदनगर जिल्हा रुग्णालयाच्या वतीने दिव्यांग प्रमाणपत्र शिबिर

राहुरी – माजी राज्यमंत्री बच्चु कडू यांच्या मार्गदर्शनाखाली प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेचे राज्याध्यक्ष बापुराव काणे यांच्या विनंती वरून प्रहार दिव्यांग संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिव्यांग बांधवांच्या तपासणी शिबिरासाठी अहमदनगर जिल्हा शल्य चिकित्सक संजयजी घोगरे यांच्याकडे मागणी केली होती. त्यानुसार जिल्हा रुग्णालयाच्या वतीने जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांसाठी दिव्यांग प्रमाणपत्र तपासणी शिबीर अहमदनगर जिल्हा रुग्णालय या ठिकाणी 28 एप्रिल पासून प्रत्येक शुक्रवारी आयोजित केले आहे.

अहमदनगर जिल्हा रुग्णालयात दर बुधवारी दिव्यांग प्रमाणपत्र तपासणी शिबीर होत असते परंतु जिल्हा मोठा असल्याने दिव्यांगाची देखील संख्या मोठी असल्याने अतिरिक्त तपासणी दि. 28 एप्रिल 2023 रोजी श्रीगोंदा व पारनेर, 12 मे 2023 रोजी राहता व कोपरगाव, 19 मे 2023 रोजी पाथर्डी व श्रीरामपूर, 26 मे 2023 रोजी राहुरी व नगर, 2 जुन 2023 रोजी अकोले व संगमनेर, 9 जुन 2023 रोजी नेवासा व शेवगाव, तसेच 16 जुन 2023 रोजी जामखेड व कर्जत तालुक्यातील दिव्यांग तपासणी होणार आहे.

तरी ज्या दिव्यांग बांधवांनी नवीन दिव्यांग प्रमाणपत्र काढाले नाही किंवा ज्यांना नवीन युनिक आयडी कार्ड मिळाले नाही, अशा दिव्यांग बांधवांनी सकाळी 9 ते 12 या वेळेत उपस्थित राहून या शिबिराचा लाभ घ्यावा. सोबत आधार कार्ड, ओरिजनल रेशन कार्ड, जुने प्रमाणपत्र, दोन पासपोर्ट फोटो घेऊन उपस्थित राहावे.

या दिव्यांग युनिक आयडी कार्ड, प्रमाणपत्र व तपासणी शिबीराचा नगर जिल्हा प्रहार दिव्यांग संघटनेचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मणराव पोकळे, उत्तर नगर जिल्हाध्यक्ष मधुकर घाडगे, जिल्हा समन्वयक आप्पासाहेब ढोकणे पाटील, महिला जिल्हाध्यक्ष लक्ष्मीताई देशमुख, जिल्हा सचिव हमीदभाई शेख, जिल्हा उत्तर नगर संपर्क प्रमुख नितीन चौधरी, जिल्हा सल्लागार सलीमभाई शेख, जिल्हा समन्वयक राजेंद्र पोकळे, जिल्हा प्रसिद्ध प्रमुख पोपटराव शेळके तसेच प्रहार दिव्यांग संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून जास्तीत जास्त दिव्यांग बांधवांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button