कृषी

पशुपालकांनी शेणखत प्रक्रियेवर भर द्यावा-कुलगुरु डॉ. शरद गडाख

राहुरी विद्यापीठ : पशुपालक शेतकर्यांनी दुग्ध व्यवसाय करताना मुक्त गोठा पध्दतीचा अवलंब करुन शेणखत प्रक्रियेवर भर द्यावा. ज्या प्रमाणे दुग्ध संकलन केंद्रे आहेत त्या पध्दतीने गांडुळखत व व्हर्मीवॉश संकलन केंद्रे गावागावात सुरु व्हावीत, असे आवाहन डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाचे व नागपूर येथील महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ (माफसू) चे कुलगुरु डॉ. शरद गडाख यांनी केले.

राहुरी तालुक्यातील खडांबे येथे भारतीय दुग्धोत्पादक शेतकरी संघ (IDFA) अहमदनगर व माफसू यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकरी शास्त्रज्ञ सुसंवाद कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणुन कुलगुरु डॉ. शरद गडाख बोलत होते. याप्रसंगी माफसूचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. अनिल भिकाणे, IDFA अहमदनगरचे रविंद्र नवले, कृषिभूषण सुरसिंग पवार उपस्थित होते.

यावेळी डॉ. अनिल भिकाणे मार्गदर्शन करतांना म्हणाले जनावरांचे व्यवस्थापन करण्यासाठी सुरुवातीला जमिनीचे व्यवस्थापन करणे महत्वाचे ठरते. यामध्ये सकस जमिनीतून सकस चारा निर्मिती होते. आणि त्या सकस चार्यामुळे जनावरे सुदृढ राहुन दुग्धोत्पादन वाढते. याप्रसंगी रविंद्र नवले यांनी IDFA च्या कार्याबद्दल माहिती दिली. त्यांनी पशुपालनातील त्रिसुत्रिंची माहिती दिली. यामध्ये प्रजनन, खाद्य नियोजन व पशुव्यवस्थापन याबद्दल माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नवनाथ खळेकर व आभार यशवंत ताकटे यांनी मानले.

या कार्यक्रमासाठी महात्मा फुले कृषि विद्यापीठातील शास्त्रज्ञ तसेच अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर, कोपरगाव, नेवासा, राहाता तालुक्यातील IDFA चे सदस्य उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी IDFA चे सदस्य जयवंत ताकटे यांनी परिश्रम घेतले.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button