अहमदनगर

डॉ. खैरे आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित

राहुरी विद्यापीठ : वनस्पती रोगशास्त्र विषयातून महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथे संशोधन सहयोगी म्हणून कार्यरत असलेले डॉ. प्रवीण बाबासाहेब खैरे यांना डॉ. बी. बी. मुंदकर या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. डॉ. एस. के. शर्मा, सहाय्यक महासंचालक (मानवी संसाधन व्यवस्थापन) भारतीय कृषि संशोधन परिषद, नवी दिल्ली, डॉ. डी. पी. एस. बदवाल ( संस्थापक, जस्ट ॲग्रीकल्चर ) व अन्य मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी, सन्मानपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.

जस्ट ॲग्रीकल्चर व एस. जी. टी. विद्यापीठ, गुरुग्राम यांच्या संयुक्त विद्यमानाने ३ रे आंतरराष्ट्रीय सभासंमेलन नवी दिल्ली गुरुग्राम येथे आयोजित करण्यात आले होते. या सभा संमेलनाद्वारे विविध विषयातील तज्ञ आणि संबंधित विषयात विशेष कामगिरी केलेल्या व्यक्तींचा सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता.

डॉ. बी. बी. मुंदकर हे भारतीय कवकशास्त्रज्ञ व वनस्पती रोगशास्त्रज्ञ होते. त्यांच्या नावाने हा पुरस्कार वनस्पती रोगशास्त्र या विषयामध्ये विशेष कामगिरी केलेल्या व्यक्तीना दिला जातो. डॉ. प्रवीण बाबासाहेब खैरे यांना विषय अनुसरून या अगोदर कृषि क्षेत्रात शेतकऱ्यांसाठी श्रध्देने व निष्ठेने केलेल्या कामासाठी १६ आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय व राज्य पातळीवर असे विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे.

डॉ. प्रवीण खैरे यांना विस्तार शिक्षण संचालक डॉ. तानाजी नरुटे, वनस्पती रोगशास्त्र विभागातील डॉ. अण्णासाहेब नवले व डॉ. संजय कोळसे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. डॉ. प्रवीण खैरे यांच्या या यशाबद्दल वनस्पती रोगशास्त्र विभागातील शास्त्रज्ञ व विद्यार्थ्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button