अहमदनगर

हिंदू एकता संघटनेच्या वतीने शिवजयंती साजरी

श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त हिंदू एकता संघटना श्रीरामपूर यांनी श्रीरामपूर सेवानिवृत्त पोलीस संघटनेचे दिलीपसिंग परदेशी यांचे हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून पुजा करून मानवंदना देण्यात आली.
यावेळी सेवानिवृत्तांचा फेटा बांधून शाल व मिठाई देऊन गौरव करण्यात आला‌. परदेशी, ढाकले, सरोदे, साबदे, मकासरे, शिंदे, वाघ, पितळे, चंद्रकांत परदेशी, भोंडवे, तोरडमल व सोमनाथ उपस्थित होते. पोलीस निरीक्षक परदेशी यांनी मनोगत व्यक्त केले की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त होणारा आम्हा सेवानिवृत्तांचा सन्मान हा अमुल्य असल्याचे सांगितले. सरोदे यांनी छत्रपतींचे कल्याण ची सुभेदार ची सुन यावर गीत गाऊन मानवंदना दिली. तर तोडमल यांनी आभार प्रदर्शन केले. हिंदू एकता संघटनेकडून होणारा सत्कार हा निश्चितच प्रेरणादायी असल्याचे सांगितले.

Related Articles

Back to top button