उंदीरगाव येथे जलजीवन मिशन योजनेचा शुभारंभ
श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : उंदीरगाव येथे जलजीवन मिशन योजनेचा शुभारंभ नुकताच अशोक कारखान्याचे माजी चेअरमन सुरेश पाटील गलांडे यांच्या हस्ते करण्यात आला.
त्यावेळी ते म्हणाले की, लोकनेते आ. भानुदास मुरकुटे हे आमदार असताना १९९५ ते ९६ या दरम्यान सुमारे तीन कोटी रुपयांची पाणी पुरवठा योजना मंजूर करून उंदीरगाव येथे जीवन प्राधिकरण पाणी पुरवठा योजने अंतर्गत ही योजना २००७ साली पूर्ण झाली. २००८ साली ही योजना ग्रामपंचायत उंदीरगाव कडे हस्तांतरीत झाली. परंतु तांत्रिक अडचणींमुळे ती बंद पडली.
त्यानंतर खा. सदाशिव लोखंडे, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे, माजी आ. भानुदास मुरकुटे, आ. लहू कानडे, करण ससाणे यांच्या प्रयत्नातून व सरपंच सुभाष बोधक, उपसरपंच रमेश गायके यांच्या पाठपुराव्याने केंद्र सरकारच्या जलजीवन मिशन अंतर्गत सुमारे चार कोटी सतरा लाख रुपये दुरुस्तीसाठी मंजूर झाले व या कामास सुरुवात झाली. तीन महिन्यात हे काम पूर्ण होऊन गावातील सर्व वाड्या वस्त्यावर तसेच पूर्ण गावात शुद्ध पाणी व पूर्ण दाबाने पाणी मिळणार आहे. त्याबद्दल सर्वांना धन्यवाद देतो.
यावेळी दूध संघ संचालक राजेंद्र पाऊलबुद्धे, अशोक कारखाना संचालक विरेश गलांडे, सरपंच सुभाष बोधक, उपसरपंच रमेश गायके, माजी जि प सदस्य बाळासाहेब नाईक, भीमभाऊ बांद्रे, प्रमोद भालदंड यांच्यासह सोसायटी, ग्रामपंचायत सदस्य दिलीप गलांडे, राजीव गिऱ्हे, सोपानराव नाईक, दीपक ताके, शशिकांत गिऱ्हे, गेणू भालदंड, वाल्मिक गायके, राजेंद्र नाईक, पांडुरंग राऊत, बाळासाहेब पडोळे, बाळासाहेब निपूंगे, भगवान ताके, अमोल नाईक, चंद्रकांत गायकवाड, सुभाष गायकवाड, दिलीप मोरे, बाळासाहेब काळे आदी उपस्थित होते. आभार प्रदर्शन रमेश गायके यांनी केले.