धार्मिकअहमदनगर

शिलेगाव येथे ४५ वा नारळी सप्ताहाचे आयोजन

कोंढवड : वाचासिध्दी प्राप्त साधु श्री संत नारायण बाबा यांच्या आशीर्वादाने गुरूदेव महंत आदिनाथ महाराज शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीक्षेत्र तारकेश्वर गड आयोजित ४५ वा नारळी सप्ताह राहुरी तालुक्यातील शिलेगाव येथे २२ मार्च ते २९ मार्च २०२३ या दरम्यान दिग्गज महाराजांच्या किर्तन व प्रवचनाने संपन्न होणार आहे.

या नारळी सप्ताहाचा प्रारंभ बुधवार, दि. २२ मार्च रोजी सकाळी १० वा. महाराजांच्या स्वागत समारंभ कार्यक्रमाने होणार आहे, तर सांगता बुधवार दि. २९ मार्च रोजी तारकेश्वर गड येथील ह.भ.प. शांतीब्रम्ह, प्रेममुर्ती, महंत गुरुदेव आदिनाथ महाराज शास्त्री यांच्या काल्याचे जाहीर हरिकिर्तनाने होईल. दि. २२ मार्च‌ च्या संध्याकाळी जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था आळंदी देवाचीचे विश्वस्त ह.भ.प. आसाराम महाराज बडे यांचे किर्तन होणार आहे. गुरुवार, दि. २३ मार्च रोजी सकाळी गिरी आश्रम, सावधे येथील ह.भ.प.कैलासगिरी महाराज, तर संध्याकाळी पंढरपूर येथील ह.भ.प. डॉ. जयंवत महाराज बोधले‌ यांचे किर्तन रुपी सेवा होणार आहे. शुक्रवार, दि. २४ मार्च रोजी सकाळी संत तुकाराम महाराज संस्थान, नेवासेचे मठाधिपती ह.भ.प. उद्धवजी महाराज मंडलिक यांचे तर संध्याकाळी डोंगरगण येथील ह.भ.प. पुंडलिक महाराज जंगले शास्त्री यांची किर्तन रुपी सेवा होणार आहे. शनिवार, दि. २५ मार्च रोजी सकाळी जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था, आळंदी देवाचीचे अध्यापक ह.भ.प. माऊली महाराज कदम यांचे तर संध्याकाळी ह.भ.प. समाजप्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांची किर्तन रुपी सेवा होणार आहे. रविवार, दि. २६ मार्च रोजी सकाळी श्री संत पटरी, श्रीक्षेत्र पिपळगाव वाचा येथील श्रीकृष्णकृपाकिंत डॉ. विकासनंदजी महाराज मिसाळ यांचे, तर संध्याकाळी बीड येथील ह.भ.प. आचार्य अमृत महाराज जोशी यांची किर्तन रुपी सेवा होणार आहे. सोमवार, दि. २७ मार्च रोजी सकाळी नागपूर येथील ह.भ.प. रामायणाचार्य रामराव महाराज ढोक यांचे तर संध्याकाळी जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था, आळंदी देवाचीचे अध्यापक ह.भ.प. उल्हास महाराज सुर्यवंशी यांची किर्तन रुपी सेवा होणार आहे. मंगळवार, दि. २८ मार्च रोजी सकाळी छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील गंगापूर येथील ह.भ.प. गाथामूर्ती रामभाऊ महाराज राऊत यांचे तर संध्याकाळी मानवत येथील ह.भ.प. उमेश महाराज दशरथे यांची किर्तन रुपी सेवा होणार आहे.

दररोज दुपारी ३ ते ४ व ४ ते ५ या दरम्यान ह.भ.प. आदिनाथ महाराज हारदे ( राहुरी ), ह.भ.प. गोकुळदास महाराज म्हसे ( कोंढवड ), ह.भ.प. भगवान महाराज मोरे ( तांदुळवाडी ), ह.भ.प. कृष्णा महाराज पेरणे ( तांदुळवाडी ), ह.भ.प. संभुगिरी महाराज गोसावी ( मानोरी ), ह.भ.प. मच्छिंद्र महाराज चोरमले ( तिळापुर ), ह.भ.प. संजय महाराज शेटे ( कणगर ), ह.भ.प. विजय महाराज तनपुरे ( राहुरी ), ह.भ.प. मच्छिंद्र महाराज ढोकणे ( उंबरे ), ह.भ.प. सोमनाथ महाराज माने ( मुसळवाडी ), ह.भ.प. नामदेव महाराज शास्त्री ( जातप ), ह.भ.प. आदिनाथ महाराज दुशिंग ( उंबरे ), ह.भ.प. चंद्रशेखर महाराज शास्त्री ( तारकेश्वर गड, पाथर्डी ), ह.भ.प. कृष्णा महाराज जिरेकर ( ब्राह्मणी ), ह.भ.प. संजय महाराज म्हसे ( शिलेगाव ), ह.भ.प. सुदर्शन महाराज शास्त्री ( त्रिभुवनवाडी ), ह.भ.प. बाळकृष्ण महाराज कांबळे ( ताहाराबाद ), ह.भ.प. मनोहर महाराज सिनारे ( निंभेरे ), ह.भ.प. बाबा महाराज मोरे ( देवळाली प्रवरा ), ह.भ.प. विजय महाराज कुहिले ( फत्याबाद ), ह.भ.प. सुनिल महाराज पारे ( वळण ) आदींची प्रवचन रुपी सेवा होणार आहे.

राहुरी तालुक्यातील शिलेगाव येथे श्रीक्षेत्र तारकेश्वर गड आयोजित ४५ वा नारळी सप्ताहाचा भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन राहुरी तालुका व शिलेगाव पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी केले आहे.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button