अहमदनगर

हरिगांव नेत्र शिबिरात 148 नागरिकांची तपासणी

श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : अग्निपंख फाउंडेशन हरेगाव उंदीरगाव आणि तुलसी आय हॉस्पिटल, नासिक यांच्या संयुक्त विद्यमानाने दिनांक 18 मार्च रोजी नेत्ररोग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. हरेगाव पंचक्रोशीतील नागरिकांनी याचा लाभ घेतला. शिबिराचा 148 नागरिकांनी लाभ घेतला. शिबिराचे उद्घाटन देशसेवेत कार्यरत असलेले मेजर अभय फुलारे व अशोक कारखाना संचालक वीरेश पाटील गलांडे, अशोक हिवाळे यांच्या हस्ते करण्यात आला.

त्यावेळी सोपान नाईक, विजय ताके, सुभाष शिंदे, साजिदभाई तांबोळी, जेम्स पंडित, विकास भाटिया, महेश निकम उपस्थित होते. तसेच सरपंच सुभाष बोधक आणि सुभाष पंडित यांनी आज फाउंडेशनच्या उपक्रमाचे कौतुक केले. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button