अहमदनगर
Trending

अवजार बँकेच्या माध्यमातून माविमच्या अनुसूचित जातीच्या महिला बचत गटांना मिळणार नवी दिशा

राहुरी : अनुसूचित जातीच्या महिलांचा आर्थिक, सामाजिक, विकास व्हावा या करिता समाज कल्याण कार्यालय, अहमदनगर यांच्या आर्थिक निधीतुन महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) यांच्या अनुसूचित जातीच्या महिलांच्या राहुरी तालुक्यातील उंबरे, पिंपरी अवघड, टाकळीमिया गावातील महिला बचत गटांना शेतीच्या कामाकरिता आवश्यक असणारी विविध अवजारे वाटप करण्यात आली. त्यात प्रामुख्याने कडबा कुट्टी मशीन, पिठाची गिरणी, बटरी स्प्रे पंप, खत पेरणी पहार संच, शेती यंत्र, सायकल कोळपे, खत पेरणी यंत्र, इत्यादी मोठे व इतर लहान यंत्र सामग्रीचा समावेश आहे. या साहित्यांचा वापर करून महिला आपल्या शेतामध्ये आधुनिक पद्धतीने शेती करून जास्तीत जास्त उत्पादन घेऊन आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह तसेच आपल्या गटाला स्वयंपूर्ण करून सर्व महिला या स्वयं रोजगाराच्या माध्यमातून सक्षम होतील. हा हेतू समोर ठेवून या औजार बँकेचे वितरण करण्यात आले आहे.

या कार्यक्रमासाठी अहमदनगर जिल्हा महिला व बालविकास चे अधिकारी श्री.वारूडकर, महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वयक संजय गर्जे, जिल्हा व्यवस्थापक सुनिल पैठणे, अवजार बँकेचे अधिकारी राम हापसे व डाॅ बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे चे राहुरी तालुका समतादूत पिरजादे एजाज यांच्या उपस्थितीत वाटप करण्यात आले. यावेळी माविम चे तालुका व्यवस्थापक श्री.अबुज, सौ. वैशाली धसाळ, मनिषा वाडकर, कल्पना काळे तसेच बचत गटांच्या सदस्या व गावातील नागरिक उपस्थित होते.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button