अहमदनगर

15 मार्चला रास्तारोको आंदोलन; राष्ट्रीय संघर्ष समितीच्या विशेष पदाधिकारी बैठकीत निर्णय

शिर्डी : महाराष्ट्र राज्यातील राष्ट्रीय संघर्ष समितीच्या प्रमुख पदाधिकार्यांची विशेष बैठक नुकतीच शिर्डी, अहमदनगर येथे कमांडर अशोकराव राऊत यांचे मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत पदाधिकार्यांनी रास्तारोको आंदोलनाबाबत जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा सविस्तर सांगितला.
या बैठकीत प्रमुख मार्गदर्शक कमांडर अशोकराव राऊत यांनी मागील आठवड्यात दिल्ली येथे कामगार मंत्री कायदा मंत्री खासदार हेमामालिनी, खासदार व माजी रक्षा मंत्री डॉ.सुभाष भांबरे, खासदार डॉ.हिनाताई गावित, मुख्य वित्त सचिव डॉ सोमनाथन, भविष्य निर्वाह निधीच्या मुख्य आयुक्त डॉ.निलीमा राव, अतिरिक्त आयुक्त, सह.आयुक्त यांचे समवेत झालेल्या बैठकी, भाजपचे सचिव विनोद तावडे, सी.बी.टी.चे प्रतिनिधी, प्रमुख कामगार संघटनेचे नेते इत्यादी समवेत झालेल्या भेटीतील वृतांत सविस्तर सांगून उच्च पेन्शनसाठी सर्व पात्र पेन्शन धारकांनी अर्ज भरून देण्याचे आवाहन केले.
राष्ट्रीय सल्लागार श्री पी.एन.पाटील यांनी दिल्ली दौऱ्यातील अनुभव कथन करून सुप्रीम कोर्ट निर्णयावर भाष्य केले. राष्ट्रीय महासचिव विरेंद्रसिंग राजावत यांनी मिनिमम पेन्शन वाढ व मा.सुप्रीम कोर्ट निर्णय आणि हाय्यर पेन्शन बाबत सविस्तर माहिती दिली. महाराष्ट्र संघटक डी.एम.पाटील, कार्याध्यक्ष कमलाकर पांगारकर, उपाध्यक्ष प्रदीप शिंदे, अध्यक्ष स.ना.अंबेकर, महिला आघाडी अध्यक्षा सौ.कविताताई भालेराव यांनी मनोगत व्यक्त केले.
राष्ट्रीय कार्यकारिणीत ठरल्याप्रमाणे देशभर येत्या १५ मार्च रोजी रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार असून प्रत्येक जिल्ह्यात हजारोंच्या संख्येने पेन्शनर सहभागी होण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत असे आवाहन करण्यात आले. बैठकीचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन पश्चिम भारत संघटक सुभाषराव पोखरकर यांनी केले तर उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष देविसिंग जाधव यांनी आभार प्रदर्शन केले.
बैठकीत शशिकांत वाडगावकर, बांबर्डे महाराज(औरंगाबाद), चंद्रकांत थोरात (उस्मानाबाद), मुजावर, अविनाश ताटे (सातारा) सोनवणे, संजय पाटील (धुळे), गोरख माळी (नंदुरबार), राऊत अप्पा, वैशाली बनसोडे (सोलापूर), घनश्याम पाटील (सांगली), बंडोपंत किल्लेदार (कोल्हापूर), कटकुरी(परभणी), रमेश नेमाडे (जळगाव), चंद्रकांत वाडकर (मुंबई), जी.यलय्या, विश्वनाथ शिंदे (नांदेड), विनायक तेंडुलकर (नवी मुंबई), अजित कुमार घाडगे (पुणे), इंद्रसिंग राजपूत, सुरेश साळुंखे ( पिंपरी चिंचवड), कैलास आहेर, अरुण शेजवळ, सुरेश जाधव (नासिक), जमदाडे (चंद्रपूर), सपकाळ (समन्वयक कराड), मोहनसिंग राजपुत (ठाणे), हमीद भाई ( बीड), प्रताप सातपुते (बारामती), संपतराव समिंदर (अहमदनगर), बुलढाणा, हिंगोली, अकोला, इत्यादी जिल्ह्यातून आलेल्या पदाधिकार्यांनी चर्चेत सहभाग घेतला.
या बैठकीस कोषाध्यक्ष बी एस नारखेडे, मराठवाडा अध्यक्ष दादाराव देशमुख, महिला आघाडी पश्चिम भारत संघटक सौ सरीताताई नारखेडे, सौ आशाताई शेळके, आशाताई शिंदे उपस्थित होत्या. बैठकीचे आयोजनासाठी सुभाषराव पोखरकर, दशरथ पवार, सुकदेव पाटील आहेर, बापूराव बहिरट, वाळके अप्पा, सुभाष अरसुळे, रामदास कोते, संपत शेळके, पुंजाजी कोते, अशोक देशमुख, खंडीझोड, लक्ष्मण हासे, चिंतामणी, सय्यद, लोळगे आदींनी विषेश परिश्रम घेतले.

Related Articles

Back to top button