कृषी

अखिल भारतीय ज्युट व तत्सम तंतुमय पिके योजना प्रकल्प उत्कृष्ट केंद्र पुरस्काराने सन्मानीत

राहुरी विद्यापीठ : अखिल भारतीय ज्युट व तत्सम तंतुमय पिके संशोधन प्रकल्प, बराकपूर, कोलकता यांच्या विद्यमाने दोन दिवसीय 34 व्या कार्यशाळेचे आयोजन महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथे करण्यात आले होते. या कार्यशाळेच्या समारोप कार्यक्रमात डॉ. आर.के. सिंग व डॉ. सुनिल गोरंटीवार यांचे हस्ते महात्मा फले कृषि विद्यापीठ, राहुरी येथील अखिल भारतीय ज्युट व तत्सम तंतुमय पिके योजना या प्रकल्पास उत्कृष्ट केंद्र पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. 
या कार्यशाळेसाठी भारतीय कृषि अनुसंधान परिषदेच्या नगदी पिके विभागाचे सहाय्यक महासंचालक डॉ. आर.के. सिंग, संशोधन संचालक डॉ. सुनिल गोरंटीवार, अधिष्ठाता डॉ. उत्तम चव्हाण, भारतीय कृषि अनुसंधान परिषदेचे ज्युट व तत्सम तंतुमय पिकांच्या केंद्रीय संशोधन संस्थेचे संचालक डॉ. जी. कार, ज्युट व तत्सम तंतुमय पिके नेटवर्क योजनेचे प्रभारी डॉ. एस. मीत्रा, वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख डॉ. विजु अमोलिक, कृषि विद्या विभाग प्रमुख डॉ. आनंद सोळंके आणि या कार्यशाळेचे आयोजक तथा सहयोगी संशोधन संचालक डॉ. राजेंद्र वाघ इ. मान्यवरांनी उद्घाटन व तांत्रिक सत्रांमध्ये सहभाग नोंदविला. या कार्यशाळेत अखिल भारतीय पातळीवरील विविध राज्यातील एकुण 9 संशोधन केंद्राचा सन 2022-23 या वर्षातील संशोधन कार्याचा आढावा घेण्यात आला.
सदरचा पुरस्कार प्रकल्पाचे प्रमुख डॉ. डी.व्ही. देशमुख यांनी स्वीकारला. 34 व्या कार्यशाळेचे उत्कृष्ठ आयोजन केल्याबद्दल कार्यशाळेचे आयोजक डॉ. राजेंद्र वाघ आणि सहआयोजक डॉ. डी.व्ही देशमुख यांना प्रमाणपत्र देवून सन्मानीत करण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी डॉ. मित्रा यांनी उपस्थित मान्यवरांचे व इतर सहभागी शास्त्रज्ञांचे आभार मानले.

Related Articles

Back to top button