महाराष्ट्र

अखेर गव्हाणी घुबडांच्या पिल्लांना निसर्गाच्या सानिध्यात केले मुक्त

धुळे : दि. २० डिसेंबर २०२२ रोजी वनविभाग व वन्यजीव संरक्षण संस्थेद्वारे पकडण्यात आलेल्या दोन गव्हाणी घुबडांच्या पिल्लांना अखेर दि. ४ जानेवारी २०२३ रोजी दाट जंगलात निसर्गाच्या सानिध्यात मुक्त करण्यात आले.
सविस्तर वृत्त असे की, दि. २० डिसेंबर रोजी पिंपळनेर येथील महाजन नगर येथे दोन गव्हाणी घुबडांच्या पिल्लांना पकडण्यात आले होते. सदर पिल्ले हे उडण्याच्या परिस्थितीत नसून इतर प्राण्यांकडुन त्यांची शिकार होऊ शकते ही बाब लक्षात घेऊन वनविभाग पिंपळनेर यांनी सदर पिल्ले पुढील संगोपनासाठी वन्यजीव संरक्षण संस्था पिंपळनेर यांच्या ताब्यात दिले. वन्यजीव संरक्षण संस्थेच्या सदस्यांनी सदर पिल्लांची उत्तम देखरेख करुन त्यांनी पिल्लांचे संगोपन केले व १५ दिवसात पिल्ले उडण्यास पूर्णपणे सक्षम झाली म्हणून दि. ४ जानेवारी रोजी सदर पिल्लांना वनविभाग पिंपळनेर चे पदाधिकारी व वन्यजीव संरक्षण संस्थेच्या सदस्यांच्या उपस्थितीत शेंदवड येथील दाट जंगलात सोडण्यात आले. घुबडांना मुक्त करताच त्यांनी उंच भरारी घेत जंगलामध्ये मार्गक्रमण केले.
यावेळी पिंपळनेर वनविभागाचे वनपाल संदिप मंडलिक, वनरक्षक अमोल पवार, वन्यजीव संरक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रमोद गायकवाड, उपाध्यक्ष दानिश पटेल, स्वप्नील चौधरी, तेजस काकुस्ते आदी उपस्थित होते.

Related Articles

Back to top button