कृषी

जलद पैदास प्रक्रियेमुळे कमी कालावधीत नविन वाण निर्माण करणे शक्य – संचालक डॉ. ए.के. सिंग

राहुरी विद्यापीठ : पिकांच्या नविन वाण निर्मितीमध्ये सामान्य परिस्थितीमध्ये आपण वर्षातून एका पिकाच्या दोन पिढ्या घेवू शकतो. परंतू जलद पैदास प्रक्रियेचा वापर करुन वर्षातून किमान सहा पिढ्या घेणे शक्य होते. या प्रक्रियेमुळे कमी कालावधीमध्ये नविन वाण निर्माण करणे शक्य होणार असल्याचे प्रतिपादन नवी दिल्ली येथील भारतीय कृषि संशोधन संस्थेचे संचालक डॉ. ए.के. सिंग यांनी केले.
महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथील विविध प्रकल्पांना भेटी दिल्यानंतर शास्त्रज्ञांना जलद पैदास प्रक्रिया व विशिष्ट ठिकाणी बदल घडवून आणण्याचे तंत्रज्ञान या विषयावर मार्गदर्शन करतांना डॉ. ए.के. सिंग बोलत होते. यावेळी कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील, अधिष्ठाता डॉ. उत्तम चव्हाण, संशोधन संचालक डॉ. सुनिल गोरंटीवार, विस्तार शिक्षण संचालक डॉ. तानाजी नरुटे, अकोला कृषि विद्यापीठातील संशोधन संचालक डॉ. व्ही.के. खर्चे, डॉ. रेणू सिंग, कुलगुरुंचे विशेष कार्याधिकारी डॉ. महानंद माने, माजी अधिष्ठाता डॉ. प्रमोद रसाळ, माजी विभाग प्रमुख डॉ. जे.व्ही. पाटील उपस्थित होते.
डॉ. ए.के. सिंग पुढे म्हणाले की जलद पैदास प्रक्रियेमध्ये पिकांना मिळणारा नेहमीची प्रकाशवेळ 22 तासापर्यंत वाढविली जाते. त्याचबरोबर तापमान 250 सें. व आर्द्रता 70 टक्क्यापर्यंत राखुन ठेवली जाते. या प्रक्रियेमध्ये सध्या हरभरा, गहू, भात, सोयाबिन व सुर्यफुल ही पिके समाविष्ट केलेली आहेत. कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यावेळी म्हणाले की जलद पैदास प्रक्रिया या तंत्रज्ञानामुळे विविध पिकांच्या संशोधनात भर पडणार असून शेतकर्यांच्या दृष्ट्रीने हे तंत्रज्ञान मोलाचे ठरेल.
महात्मा फुले कृषि विद्यापीठातही हे संशोधन सुरु असल्याचे यावेळी ते म्हणाले. या कार्यक्रमासाठी विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील शास्त्रज्ञ ऑनलाईन उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. पवन कुलवाल यांनी केले. या कार्यक्रमासाठी सहयोगी अधिष्ठाता डॉ. श्रीमंत रणपिसे, डॉ. गोरक्ष ससाणे, कृषि विद्या विभाग प्रमुख डॉ. आनंद सोळंके, वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख डॉ. विजू अमोलिक, गहू विशेषज्ञ डॉ. सुरेश दोडके, कडधान्य पैदासकार डॉ. नंदकुमार कुटे आदी अधिकारी व वनस्पती शास्त्र विषयातील आचार्य संशोधन विद्यार्थी सिध्दनाथ शेंडेकर उपस्थित होते.

Related Articles

Back to top button