अहमदनगर

ऊस उत्पादकांच्या विविध विषयांवर नेवासा तहसील कार्यालयात बैठक संपन्न

नेवासा : तालुक्यातील मुळा सहकारी, श्री ज्ञानेश्वर सहकारी व गंगामाई साखर कारखान्यांच्या गाळप हंगामाच्या प्रारंभी ऊस दर, ऊस उत्पादकांना उसाचे वजन खाजगी वजन काट्यावर करण्याचे स्वातंत्र्य, ऊस बिलातील बेकायदेशीर कपाती, साखर उताऱ्यातील घट, आदी प्रमुख विषयाबाबत बैठक नेवासा तहसील कार्यालयाच्या सभागृहात तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांचे अध्यक्षतेखाली झाली.
यावेळी शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष रघुनाथदादा पाटील, खासदार सदाशिव लोखंडे, माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, राज्य ऊस नियंत्रण मंडळाचे सदस्य बाळासाहेब पटारे, क्रांतिसिंह नानापाटील ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष शिवाजीनाना नांदखिले, शेतकरी संघटनेचे जिल्हा ऊस उत्पादक प्रमुख जगन्नाथ कोरडे, जिल्हा संघटक भास्करराव तुवर, जिल्हा उपाध्यक्ष विलास कदम, नेवासा तालुका शेतकरी संघटनेचे त्र्यंबक भदगले, मनोज हेलवडे, संबंधित सर्व साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक, प्रतिनिधी व शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Back to top button