अहमदनगर

हरिगांव येथे ख्रिस्तराजा सोहळा

श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : तालुक्यातील हरिगांव येथे ख्रिस्तराजा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. रविवार दिनांक 20 नोव्हेंबर 2022 रोजी विश्वाचा राजा ख्रिस्तराजा या सोहळ्या निमित्त डी. क्वाटर राजू पठारे यांच्या  घरासमोरून ते संत तेरेजा चर्च हरिगांव पर्यंत भव्य मिरवणूकीचा प्रारंभ सकाळी 6.45 वाजता होईल व त्यानंतर  ठीक 7.30 वाजता नासिक धर्मप्रांत महागुरुस्वामी लुर्ड्स डॅनिअल हे सर्वांसाठी पवित्र मिस्सा अर्पण करतील. या पवित्र मिस्सेसाठी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन सर्व स्थानिक धर्मगुरू फा. डॉमिनिक, रोझारिओ फा. रिचर्ड, अंतोनी, फा. सचिन मुंतोडे यांनी केले आहे.

Related Articles

Back to top button