अहमदनगर

छत्रपती संभाजीराजेंच्या संगमनेर दौऱ्यात स्वराज्य प्रणित छावा क्रांतिवीर सेनेचा बोलबाला

संगमनेर शहर – तालुक्यातील पेमगिरी शहागड येथे येण्यासाठी स्वराज्य प्रणित छावा क्रांतिवीर सेनेच्या वतीने राजेंना १९ ऑक्टोबर २०२२ रोजी निमंत्रण देण्यात आले होते. स्वराज्य प्रमुख छत्रपती संभाजीराजे भोसले यांना स्वराज्य प्रवक्ते करणभाऊ गायकर यांनी शहागडवर येण्याचा आग्रह धरल्याने छत्रपती संभाजीराजेंनी पेमगिरी शहागडावर पेमा देवीचे दर्शन घेऊन नुकतीच हजेरी लावली. 
राजेंनी प्रथम स्वराज्य प्रणित छावा क्रांतिवीर सेना घुलेवाडी लोकनियुक्त सरपंच पदासाठी उभे असलेल्या सौ भाग्यश्री राऊत यांच्या निवास्थानी भेट दिली. यावेळी राजेंचे स्वागत मोठ्या जल्लोषात फुलांची उधळण करत करण्यात आले. त्या नंतर छावा क्रांतिवीर सेना व रामराज्य प्रतिष्ठानच्या वतीने शहरात शासकीय विश्रामगृह येथे ढोल ताशा पथक वाजवत स्वागत करण्यात आले. यावेळी छावा क्रांतिवीर सेना जिल्हा प्रमुख आशिष कानवडे, श्रीरामपूर चे रोहित यादव यांची छत्रपती संभाजीराजे यांच्या प्रमुख उपस्थितीत स्वराज्य प्रवक्ते करण गायकर यांनी अहमदनगर जिल्हा निमंत्रक पदी निवड करून शुभेच्छा दिल्या.
यावेळी तरुणांनी एकच जल्लोष करत घोषणा देत विश्रामगृह येथील परिसर दणाणून सोडला. पेमगिरी येथे स्वराज्य संकल्प भूमी शहगडावर रविंद्र डूबे, सूरज डूबे, दत्ता शेटे, आशिष कानवडे, गणेश थोरात, सचिन गांजवे यांना सोबत घेऊन देवीचे दर्शन घेतले. संगमनेर ते पेमगिरी प्रवासा दरम्यान संभाजीराजेंचे संघटनेच्या वतीने ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले. राजेंच्या या दौऱ्यात स्वराज्य प्रणित छावा क्रांतिवीर सेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सोबत होते.

Related Articles

Back to top button