अहमदनगर

पवित्र मरीयेवर आपली दृढ श्रद्धा ठेवावी – महागुरु स्वामी अम्ब्रोज रिबेलो

श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : पवित्र मारीयेवर आपली दृढ श्रद्धा ठेवावी असे प्रतिपादन महागुरु स्वामी औरंगाबाद अम्ब्रोज रिबेलो यांनी हरिगाव मतमाउली भक्तिस्थान येथे संत तेरेजा चर्च डोंगरासमोर झालेल्या ४ सप्टेंबर रोजी यात्रापूर्व चौथ्या नोव्हेना प्रसंगी केले.
महागुरुस्वामी अम्ब्रोज रिबेलो यांनी “प. माळेच्या रह्स्यातील प.मारीयेचे वैभवशाली दर्शन” या विषयावर प्रवचन करताना सांगितले की, देव प्रत्येक माणसाला बोलावतो त्याला नियुक्त करतो ते काम करण्यावर सोडून देतो. मनोमनी सोपविलेले काम आत्मविश्वासाने पार पाडशील. त्या देवाच्या मातेचा आपण सन्मान करीत आहोत. तो जे सांगेल ते करा ती प्रेशितीय कार्याची प्रेरक शक्ती आहे. देवाने सांगितले माझे अनुयायी व्हा मासे धरू नका तर माणसे धरा, जोडा, परमेश्वराने पवित्र मारियेला बोलावले. तिच्या क्रौमार्य मध्ये मातृत्वाचे दान दिले व प्रभू येशूला जन्म दिला. ती निष्कलंक आहे. तिच्याबद्दल अनेकांनी विविध शंका घेतल्या. त्यापैकी प.मरिया ही देवाची आई आहे हे सर्वांनाच पटले. पोप यांनी मान्य केले व म्हणाले लोकांनी जे मानले ते आम्ही स्वीकारतो, व लोकांना शिकवतो की ते सत्य आहे. देवाने जगाच्या निर्मितीचे स्वप्न पाहिले तेंव्हा देखील पवित्र मरिया होती.
विश्व निर्माण करताना प्रभू जन्माला येणार क्रुसावर मरण येणार ह्याची जाणीव होती. प्रभू येशू दरवाजा बंद असताना शिष्याला आत कसा भेटायला जातो हे विशेष. तसेच प.मरिया निष्पाप व पवित्र मानतो. ती देवमाता आहे ईश्वर कन्या आहे. आपला विश्वास तिच्या मार्गावर आहे. ती प्रभू येशूची आई नसून सर्व मानवजातीची आई आहे. हरिगाव सर्व जाती धर्माचे लोक येतात दर्शन घेतात. आपले नवस फेडतात. एका भाविक स्त्रीने सांगितले आमच्या पण देव देवता आहेत. पण मला प. मरीयेने आपल्या पोटाजवळ बेंबीजवळ हृदयाशी बाळ घेतले आहे. त्या आईचे व बाळाचे ठोके एक झालेले आहे. एकजीव झाले आहेत. ती आई आहे तिला मायेचे भान आहे. बाळाचे रडगाणे तिला माहित आहे. असे सुंदर उत्तर दिले. त्याच प्रमाणे आपले आणि प.मारीयेचे नाते जोडलेले आहे. त्यामुळे आमची श्रद्धा डगमगणार नाही. तशीच दृढ राहील. त्यासाठी मोकळ्या मानाने येथे आलो आहोत. तर तिला सांगू या नतमस्तक होऊ या व आमच्या सर्वांच्या विविध मदतीला धावून ये.
नोव्हेना प्रसंगी प्रमुख धर्मगुरू सुरेश साठे, डॉमनिक रोझारीओ, रिचर्ड, अंतोनी, सचिन मुन्तोडे, सहभागी होते. दि. ५ सप्टेंबर रोजी फा. संजय पारखे यांचे मानवाच्या तारणातील प.मरिया मध्यस्थीचे महत्व या विषयावर व दि. ६ सप्टेंबर रोजी फा. फ्रान्सिस ओहोळ यांचे सांत्वनकर्ती नित्य सहाय्यक माता मरिया”या विषयावर प्रवचन होईल.

Related Articles

Back to top button