अहमदनगर

जनसामान्यांच्या जीवनातलं उत्तुंग व्यक्तिमत्व – उद्योजक दिलीपतात्या जगताप

अभिष्टचिंतन विशेष
बाळकृष्ण भोसले | राहुरी – स्वप्न पाहता- पाहता ते साकारणारी व प्रत्यक्षात उतरविणारी माणसं जीवनात यश-अपयश पचवून मोठी होतात. त्यात काही पैशाने मोठी होतात, काही गर्वाने मोठी होतात तर सामाजिक भान जपणारी माणसं मात्र मनाने मोठी होत असतात आणि तीच माणसं खरी श्रीमंत समजली जातात. याच परिपेक्षातील जनसामान्यांच्या जीवनचक्राला गतीमान करणारं उत्तुंग व्यक्तिमत्व म्हणून पाहिला जाणारा यशस्वी उद्योजक दिलीप (तात्या) भिकाजीराव जगताप यांच्याकडे आदरपुर्वक लक्ष जातं.
तात्या म्हणजे अबालवृध्दांचं प्रेरणास्रोत बरोबरच जनसामान्यांच्या प्रगतीला गतीमान करण्याचं चालतं बोलतं विद्यापीठ… जे कुठेही कधीही सदोदित हसतमुखाने आस्थेवाईक विचारपूस करणारं अंधारातून प्रकाशाकडे नेण्यासाठी नेहमीच दिशादर्शी असणारं…
श्री दिलिपतात्या पुर्वीपासुनच ध्येयवेडा माणूस पाहिलेलं ते प्रत्यक्षात उतरविण्यासाठी सतत प्रयत्नशील सायकल वरून डेअरीला दूध घालता- घालता मनाशी काहीतरी करण्याची खुणगाठ बांधत मोठ्या व्यवसायात पडण्यासाठीची त्यांची धडपड चांगल्या मोठ्या उद्योजकालाही लाजवेल अशीच राहिलीयं. अनंत अडचणीवर मार्ग काढत ध्येयापर्यंत पोहोचण्याची त्यांची जिद्द नि आत्मविश्वास पाहिला तर त्यातून आजच्या नवीन पिढितील तरूणांनाचे ते यामुळेच आयडॉल बरोबरच प्रेरणास्ञोत राहिले आहेत. व्यवसायात नफा नुकसान होतच राहते मात्र त्यातून खचून न जाता नव्या उमेदिने जणू फिनिक्स पक्षाप्रमाणे राखेतून उठून पुन्हा स्वैर भरारी मारण्याचा त्यांचा गुण आजच्या तरूणाईला पथदर्शी असाच म्हणता येईल. क्षेत्र कोणतेही असो त्यात निश्चल, अविरत व सातत्य ठेवून प्रयत्नरत राहिल्यास यश दूर नाही यावर त्यांचा ठाम विश्वास आहे. 
प्रामाणिकता, सचोटी बरोबरच अढळ आत्मविश्वास ही जीवनात यशस्वी होण्यासाठीची यशस्वी गुरूकिल्ली असल्याचं ब्रीद त्यांनी अंगीकारल्यानेच राष्ट्रीय पातळीवरच्या पुरस्कारालाही ते पात्र ठरले आहेत. शांत नि संयमी स्वभावाबरोबरच लहानातल्या लहानाला मोठं म्हणण्याचा त्यांचा गुण नक्कीच आदर्शवत असाच म्हणावा लागेल. यशाची शिखरे चढताना सुरूवाती पासून आपल्याबरोबर असलेल्या कामगाराला आताही काय अडचण आहे हे आस्थेवाईकपणे विचारून त्यांना माया देणारं हे अदभूत रसायण असल्याचे त्यांचे कामगार सांगतात. म्हणूनच कदाचित शुन्याचीही बेरीज करण्याची क्षमता तात्यांकडं असल्याने त्यांच्या सानिध्यातली माणसं त्यांच्यावर आदरपुर्वक निस्सीम प्रेम करतात. हा त्यांच्यातला आपलेपणा आहे. त्यामुळेच जनसामान्यांच्या प्रती समर्पित असं व्यक्तिमत्व म्हणून दिलीप तात्या जगताप यांच्याकडं आदरपुर्वक पाहिलं जात. 
त्यांच्या अभिष्टचिंतनानिमित्त त्यांना दिर्घायुष्यासाठी लाख – लाख शुभकामना…

Related Articles

Back to top button