अहमदनगर

लोणी खुर्द विविध कार्यकारी सेवा संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न

लोणी : लोणी खुर्द विकास सेवा संस्थेची ७६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा आ.चंद्रभान दादा घोगरे पाटील सभागृहात संस्थेचे मार्गदर्शक एकनाथराव घोगरे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली.
संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र आहेर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या सभेत सभे विषय सचिव सोमनाथ पवार यांनी वाचन केले, त्यावर सविस्तर चर्चा होवुन सर्वानुमते मान्यता दिली. मागील आर्थिक वर्षात लाखो रुपये अनावश्यक खर्च दिसतो. गोडाऊन दुरुस्ती व उद्घाटन खर्च, रंगरंगोटी, तसेच तिन लाखांच्या वसुलीसाठी बारा लाखांचा कोर्ट खर्च यात विस लाख रुपये अनावश्यक खर्च झालेला असुन यावर सभासदांनी तत्कालीन संचालक मंडळाच्या कारभारावर तिव्र नाराजी व्यक्त केली.
यामुळे विस वर्षापासून संस्थेला केंद्र शासनाकडून सक्षमीकरण योजनेचे दिड लाखांचा लाभ मिळाला नाही. त्यामुळे संस्थेचा यातही जवळपास तिस लाख रुपये तोटा झालेला आहे. तिन महिन्यांपूर्वी सरपंच जनार्दन घोगरे यांच्या नेतृत्वाखाली संस्थेत संत्तातर झाले असुन सत्ताधाऱ्यांनी चांगला व स्वच्छ कारभार करावा अशी प्रतिक्रीया सभासदांनी व्यक्त केली. श्रीकांत मापारी यांनी सांगितले की, संस्थेच्या कार्यक्षेत्रात सातबारा उतारा नसलेले व संस्थेत कोणताच व्यवहार नाही अशाना सभासदत्व दिलेले आहे. संस्थेचे व सहकार खात्याचे नियम डावलून झालेले हे सभासद कमी करण्याचा मांडलेला ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला.
सभेचे मार्गदर्शक एकनाथ घोगरे यांनी आठवणी सांगताना संस्थेचे खत डेपो, किराणा माॅल, कापड दुकान, स्वस्त धान्य दुकान, डिझेल लायसन्स व उपविभाग होते. आता ते बंद झालेले आहेत. अनावश्यक खर्च केल्याने संस्था अडचणीत आली आहे. सत्तेवर आलेल्या नवीन संचालक मंडळाने सभासदांचे व संस्थेच्या हीतासाठी अनावश्यक खर्च टाळवा म्हणजे केंद्राकडून सक्षमीकरण अनुदानासाठी आपली संस्था पात्र होईल असा आशावाद व्यक्त केला. यावेळी रायभान आहेर, राजेंद्र घोगरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र आहेर यांनी आभार मानले. प्रास्ताविक संचालक महेश आहेर यांनी केले.
यावेळी लोणी खुर्दचे सरपंच जनार्दन घोगरे, व्हा. चेअरमन बाबासाहेब मापारी, संस्थेचे सर्व संचालक, जिल्हा बँक शाखाधिकारी श्री उगले, आबासाहेब आहेर, त्र्यंबकराव जोशी, देवमन घोगरे, सुभाष आहेर, रायभान आहेर, संजय आहेर, उत्तमराव घोगरे, विलास आहेर, विलास घोगरे, आनिल आहेर, चांगदेव घोगरे, मधुकर घोगरे, दिनकर आहेर, गणेश दिघे, बाळासाहेब आहेर, दिपक घोगरे यांच्यासह सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Back to top button