अहमदनगर

हरिगाव मतमाउली यात्रा महोत्सव; ३१ ऑगस्टला महागुरूस्वामी हस्ते शुभारंभ

श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : तालुक्यातील हरिगाव संत तेरेजा चर्च मतमाउली भक्तिस्थान येथे नऊ शनिवार नोव्हेना होत असून दि ३१ ऑगस्ट रोजी हरिगाव मतमाउली यात्रा ७४ वा महोत्सव शुभारंभ नासिक धर्मप्रांत महागुरुस्वामी डॉ लूरडस डानियल यांच्या शुभहस्ते ध्वजारोह्णाने होणार असून मुख्य यात्रा महोत्सवापर्यंत रोज सायंकाळी ५.३० वाजता नोव्हेना भक्ती व विविध धर्मगुरू यांचे पवित्र मरीयाच्या विविध विषयावर प्रवचन होणार आहे.
मुख्य मतमाउली यात्रा महोत्सव शनिवार १० सप्टें व रविवार ११ सप्टें रोजी उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. दि ३१ ऑगस्ट- महागुरुस्वामी लूरडस डानियल यांच्या हस्ते ध्वजारोहण व यात्रा शुभारंभ, सोहळा, दि. १ सप्टेंबर – महागुरुस्वामी पुणे रा.रे डॉ थोमस डाबरे विषय- “देवदूताच्या संदेशात प.मारिया दि. २- फा. पितर डिसोजा-प.मारीयेची सात दु:खे” दि. ३ फा.अजय डिमोनटी,- “तो जे सांगेल ते करा प्रेशीतीय कार्याची प्रेरक शक्ती” दि. ४ -बिशप औरंगाबाद अम्ब्रोज रिबेलो,” प.माळेच्या रहस्यातील प.मारीयेचे वैभवशाली दर्शन” दि. ५ –फा.संजय पारखे” मानवाच्या तारणातील प.मरीयेचे मध्यस्थीचे महत्व” दि. ६- फा फ्रान्सिस ओहोळ- “सांत्वनकर्ती नित्य सहाय्यक माता मरिया”  दि. ७- फा डॉमिनिक ब्राम्हणे- प.मरीयेचे पृथ्वीवरील प्रकटीकरणाव्दारे मिळालेला संदेश, दि. ८- फा भाऊसाहेब संसारे-सिनड २०२२-२३ ख्रिस्त सभेच्या सहवासात प.मरीयेची सहभागीता” दि. ९ – बिशप बार्थोल बरेटो- “प.मरीयेचे चर्चमधील स्थान” दि. १० सप्टेंबर रोजी यात्रा महोत्सव दिनी दुपारी ४.३० वाजता महागुरुस्वामी नासिक लूरडस डांनियल यांचे ” प.मरीयेच्या जन्माचा उद्देश” या विषयावर प्रवचन व प.मिस्सा होणार आहे.
भाविकांनी महोत्सवात सहभागी होण्याचे आवाहन हरिगाव संत तेरेजा चर्च प्रमुख धर्मगुरू सुरेश साठे, डॉमनिक रोझारिओ, सचिन मुन्तोडे, रिचर्ड अंतोनी, तसेच सर्व धर्मभगिनी, हरिगाव, उन्दिरगाव ग्रामस्थ, पदाधिकारी यांनी केले आहे.

Related Articles

Back to top button