कृषी

गृह उद्योगासह शेतीविषयक मार्गदर्शन मेळावा संपन्न

राहुरी विद्यापीठ : नेवासा तालुक्यातील सुलोचना बेल्हेकर सामाजिक व बहुउद्देशीय संस्था संचलित कृषी महाविद्यालय भानसहिवरे येथील विद्यार्थिनी कु.सुवर्णा भारत थोरात हिने ग्रामीण जागरूकता आणि कृषी औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रम २०२१-२२ अंतर्गत महिलांना गृहउद्योगासह शेतीविषयक मार्गदर्शन केले.
आजकाल महिला ह्या नुसत्या चूल आणि मूल न करता पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून शास्त्रीय व तंत्रशुद्ध पद्धतीने काम करताना दिसत आहे असे थोरात हिने सांगितले. थोरात हिने परिसरातील महिलांना दुधाचे वेगवेगळे पदार्थ – बासुंदी, खवा, पेढे, केळीचे वेफर्स, टोमॅटो सॉस यांसारखे पदार्थ तयार करून जास्तीत जास्त नफा कसा मिळवता येईल यावर मार्गदर्शन केले.यावेळी महिलांनी विचारलेल्या प्रश्नांची तिने समर्पक उत्तरे दिली व त्यांना नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती दिली.या संपूर्ण कार्यक्रमासाठी तिला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अतुल दरंदले, कार्यक्रम समन्वयक प्रा. एम.आर.माने, प्रा. सी.के.गाजरे, प्रा. पी. बी.काळे मॅडम या सर्वांचे मार्गदर्शन लाभले.

Related Articles

Back to top button