अहमदनगर

विविध राजकीय पक्षातील तरुणांचा राहुरी मनविसे मध्ये जाहीर प्रवेश

अहमदनगर शहराध्यक्ष गजेंद्र राशीनकर, मनसे नेते नितीन कल्हापुरे, विजय मोगले, अरूण चव्हाण यांच्या उपस्थितीत तरुणांचा मनसे मध्ये प्रवेश.


आरडगांव / राजेंद्र आढाव : राजसाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित होऊन व महाराष्ट्र नवनिर्माण सहकार सेना सरचिटणीस अनिल चितळे ह्यांच्या मार्गदर्शनाखाली राहुरी तालुक्यातील विविध पक्षातील असंख्य तरुणांचा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेत जाहीर प्रवेश झाला. अहमदनगर शहराध्यक्ष गजेंद्र राशीनकर ह्यांच्या प्रमुख उपस्तिथीत व राहुरी तालुका मनसे नेते नितीन कल्हापूरे, मनविसे उत्तर जिल्हाध्यक्ष विजय मोगले, मनसे उपजिल्हाध्यक्ष अरुण चव्हाण, मनसे शहराध्यक्ष प्रतिक विधाते ह्यांच्या मार्गदर्शनाखाली व विद्यार्थी सेना तालुकाध्यक्ष सागर माने ह्यांच्या नेतृत्वाखाली प्रवेशाचा कार्यक्रम राहुरी येथे पार पडला.

राहुरी शहर व ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांचा धरमाडी विश्रामगृह येथे मनविसेत जाहीर प्रवेश केला.

    त्याप्रसंगी शहर संघटक राजाभाऊ आढागळे, मनोज जाधव, दीपक वराळे, महेश तमनर, उपतालुकाध्यक्ष प्रदीप धनवडे, विद्यार्थी सेना उपतालुकाध्यक्ष प्रणव गाडे, विक्रम खडके, सौरभ गावखरे, वाल्मिक खडके, संकेत भोसले, नवनाथ शेडगे, दिनेश शेडगे, ज्ञानेश्वर बानकर, अनिल हापसे, शरद वराळे, प्रवीण कोरडे, प्रसाद गुंजाळ, रुपेश रुपणर, पप्पू गुंजाळ, लक्ष्मण धोत्रे आदी तरुणांनी मनसे मध्ये प्रवेश केला. राहुरी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना शहराध्यक्ष पदी प्रसाद गुंजाळ ह्यांची नियुक्ती करण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Back to top button