कृषी

कृषी विद्यार्थिनीने केले शेतीविषयक ॲप्स वापराबाबत मार्गदर्शन

बाभूळगाव येथे कार्यशाळा कृषिकन्या सुवर्णा थोरात हिने दिली माहिती


राहुरी विद्यापीठ प्रतिनिधी : महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत ,कृषी महाविद्यालय भानसहिवरे येथील विद्यार्थिनी कु.सुवर्णा भारत थोरात या विद्यार्थिनीने मेळावा आयोजित करून शेतकऱ्यांना इंटरनेट व वेगवेगळ्या ॲप्सच्या शेतीविषयक वापराबाबत मार्गदर्शन केले.
        बदलत्या हवामानामुळे शेती करत असताना शेतकऱ्यांना वेगवेगळ्या समस्यांना तोंड द्यावे लागते. हवामान बदलामुळे वेगवेगळे रोग व कीड यांचा पिकांवर प्रादुर्भाव वाढतो व मोठ्या प्रमाणावर पिकाचे नुकसान होते. हे टाळण्यासाठी इंटरनेटवर उपलब्ध असणाऱ्या वेगवेगळ्या ॲप्सचा वापर केला तर वेळीच या रोगाला प्रतिबंधात्मक उपाययोजना करून आळा घालता येतो. हे करता यावे व शेतकऱ्यांना अधिकाधिक उत्पादन घेण्यास मदत मिळावी व पिकवलेले पीक योग्य बाजार भावात विकता यावे म्हणून सुवर्णा थोरात हिने शेतकऱ्यांना त्याबाबतचे प्रशिक्षण देऊन आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर व उत्पन्न वाढीचा कानमंत्र दिला. यावेळी तिने रोग व कीड संदर्भात विस्तृत माहिती देत चांगल्या व निरोगी पिकासंदर्भात शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.तसेच वेगवेगळ्या बाजारपेठ, बाजार भाव यांची इंटरनेट वर उपलब्ध असणारी माहिती देखील शेतकऱ्यांना दिली. यावेळी शेतकऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची तिने समर्पक उत्तरेही दिली. यावेळी शेतकऱ्यांना इंटरनेट ॲप्सच्या वापरासंदर्भात प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी तिला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अतुल दरंदले, कार्यक्रम समन्वयक प्रा.एम.आर.माने , प्रा.सी.के.गाजरे यांचे मार्गदर्शन लाभले.

Related Articles

Back to top button