ठळक बातम्या

शिक्षक भारतीचे राज्यव्यापी धरणे आंदोलन

शिक्षक भारती संघटना आक्रमक : क्रांती दिनी राज्यव्यापी आंदोलन


राहुरी विद्यापीठ प्रतिनिधीऑगस्ट क्रांती दिनाच्या दिवशी देशभरातील शेतकरी संघटना, कामगार संघटना, प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावरील विविध शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटना एकदिवशीय देशव्यापी आंदोलन करणार आहेत. शिक्षण बचाव मंच अंतर्गत झालेल्या विविध संघटनाच्या बैठकीत दिल्ली येथील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा, सर्वांना जुनी पेन्शन योजना, विद्यार्थी, शिक्षक व जनता विरोधी नवे शैक्षणिक धोरण रद्द करा, विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणासाठी प्रति विद्यार्थी रु. २००० नेटपॅक भत्ता आणि मोफत मोबाईल अथवा टॅब द्या, अनुसूचित जाती – जमाती व गरीब विद्यार्थ्यांसाठी विशेष आर्थिक शैक्षणिक पॅकेज घोषित करा, इत्यादि मागण्यांसाठी देशव्यापी आंदोलन होणार आहे. या आंदोलांनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात होणाऱ्या आंदोलनात सहभागी होण्याचा निर्णय शिक्षक भारतीने घेतला आहे. 
   ९ ऑगस्ट २०२१ रोजी शिक्षक भारती संघटनेच्या सर्व विभागीय अध्यक्ष, जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष, सदस्य आणि पदाधिकारी यांनी आपल्या विभागात शिक्षण उपसंचालक कार्यालय, शिक्षण निरीक्षक अथवा शिक्षणाधिकारी कार्यालय येथे दुपारी २ ते ४ या वेळात धरणे आंदोलन करणार आहे. आंदोलन करताना कोविडचे सर्व निर्देश व नियम यांचे काटेकोरपणे पालन  संघटना करणार आहे.
संघटनेच्या मागण्या
• राज्यातील सर्व घोषित व अघोषित विनाअनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा आणि तुकड्यांवरील कार्यरत शिक्षक शिक्षेकेतर कर्मचारी यांना १००% वेतन सुरू करावे.
• रात्रशाळा व रात्रजूनियर कॉलेज उद्ध्वस्त करणारा १७ मे २०१७ चा शासन निर्णय रद्द करावा. 
• दि. २८ ऑगस्ट २०१५ व  ७ ऑक्टोबर २०१५ चे जाचक शासन निर्णय रद्द करा. शहरी भाग २५, ग्रामीण भाग २०, डोंगराळ भाग १५ विद्यार्थी तुकडीचा निकष कायम ठेवा. कला, क्रीडा व आय.सी.टी. शिक्षकांचा संचमान्यतेत समावेश करा.  
• माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांसाठी देय ठरलेल्या वरिष्ठ व निवड श्रेणीसाठी आवश्यक असणारे ऑनलाईन प्रशिक्षण तात्काळ देण्यात यावे. तसेच निवडश्रेणीसाठी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाची एम. ए. माहिती संप्रेषण हा अभ्यासक्रम ग्राह्य धरण्यात यावा
• सावित्री फातिमा शिक्षक कुटुंब स्वास्थ्य योजना त्वरित लागू करा. 
• सध्या सुरू असलेली वेळखाऊ व भ्रष्टाचाराला खतपाणी घालणारी शालार्थ आयडी देणारी संगणक प्रणाली शिक्षण उपसंचालक स्तरावर त्वरित रद्द करण्यात यावी. शिक्षणाधिकारी/शिक्षण निरीक्षक यांना शालार्थ आयडी देण्याचे अधिकार दयावेत.
• प्राथमिक,माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावरील सहाय्यक शिक्षक (परिविक्षाधीन) यांना किमान वेतन कायद्यानुसार रु. १८००० मानधन देण्यात यावे.  
• सन २०१८ -१९ पासून प्रलंबित असलेल्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या सदोष संचमान्यता दुरुस्त करण्याची कार्यवाही तात्काळ करावी.
• कोविड सह इतर आजाराने मयत झालेल्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचार्यांच्या पाल्यांना अनुकंपा तत्त्वावर तात्काळ नोकरी देण्यात यावी. पोस्ट कोविड आजारांचा वैद्यकीय प्रतिपूर्ती योजनेत समावेश करा. 
• शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी यांना कोविड ड्युटी मधून पुर्णतः वगळावे. त्यांना ऑनलाईन आणि ऑफलाईन शैक्षणिक कामकाजामध्ये पुरेसा वेळ देण्यासाठी इतर अशैक्षणिक कामकाजातून वगळावे. 
• माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावर काम करणारे इतर मागासवर्गीय कर्मचारी त्यांच्या पाल्यांना उच्च शिक्षणामध्ये आवश्यक असणारा नॉन क्रिमीलेअर चे प्रमाणपत्र मिळण्यासाठी शासनाच्या दिनांक 04.01.2021 च्या शासन निर्णयाद्वारे तात्काळ कार्यवाही होण्याबाबत संबंधितांना आदेशित करण्यात यावे. यामध्ये नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र देताना  नोकरीतून मिळणारे वेतन आणि शेतीचे उत्पन्न वगळून केवळ अन्य उत्पन्नाचा आधार घेतला जावा.
• राज्यातील प्लॅनमधील शाळाचे वेतन नॉनप्लॅन मध्ये करावे. ( सैनिकी शाळा, आदिवासी शाळा, अंशत: अनुदानित शाळा)‌‌ शिक्षक भारती संघटनेचे राज्य सचिव सुनील गाडगे माध्यमिक विभागाचे जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब जगताप,उच्च माध्यमिक विभागाचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र आरु, सरचिटणीस महेश पाडेकर जिल्हा उपाध्यक्ष सचिन जासूद,  रामराव काळे,कार्याध्यक्ष किशोर डोंगरे ,जिल्हा प्रसिद्धी प्रमुख अमोल चंदनशिवे, उर्दू विभागाचे जिल्हाध्यक्ष मोहम्मद समी ,शेवगाव तालुकाध्यक्ष मफीज इनामदार,सचिन लगड, श्रीगोंदा महिला अध्यक्ष रूपाली बोरुडे,  रुपाली कुरूमकर,कैलास राहणे,श्याम जगताप,दिनेश शेळके ,प्रवीण मते,संजय तमनर, माध्यमिक विभागाचे सचिव विजय कराळे, बाबासाहेब लोंढे,राजेंद्र जाधव,सुदाम दिघे,संभाजी पवार,कैलास जाधव,हनुमंत रायकर,नवनाथ घोरपडे,किसन सोनवणे,सिकंदर शेख, संजय पवार,सुदर्शन ढगे,अशोक अन्हाट,संभाजी चौधरी, शेख,श्रीकांत गाडगे,सुर्यकांत बांदल, जॉन सोनवणे,बाळासाहेब शिंदे, रेवन घंगाळे,प्रशांत कुलकर्णी, एम पी शिर्के,हनुमंत बोरुडे,सोमनाथ बोंतले,प्रकाश मिंड,मधुकर नागवडे,महादेव कोठारे,संतोष देशमुख,योगेश कराळे, महिला जिल्हाध्यक्ष, आशा मगर,विभावरी रोकडे,मीनाक्षी सूर्यवंशी, शकुंतला वाळुंज,छाया लष्करे, काशीनाथ मते
सर्व जिल्हा तालुका पदाधिकारी शिक्षक भारती संघटना अहमदनगर आदींनी या मागणीसाठी पाठींबा दिला.

Related Articles

Back to top button