अहमदनगर

युवासेना राहुरी उपाध्यक्षपदी आढाव

युवासेनेच्या राहुरी उपाध्यक्षपदी धनंजय आढाव यांची निवड करताना शिवसेना जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे.


राहुरी प्रतिनिधी : युवासेनेच्या उपाध्यक्षपदी तालुक्यातील वळण येथील धनंजय विक्रम आढाव यांची निवड करण्यात आली आहे. वळण येथील शिवसंपर्क अभियानादरम्यान शिवसेना जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे यांनी आढाव यांच्या निवडीची घोषणा केली. धनंजय आढाव यांची शिवसेनेतील संघटनात्मक कामगिरी आणि पक्षीयनिष्ठा विचारात घेऊन खेवरे यांनी आढाव यांच्या वर युवासेनेची जबाबदारी सोपवली आहे. निवडीनंतर बोलताना आढाव म्हणाले, शिवसेनेचे ध्येयधोरण, विचारसरणी सर्वसामान्य व तळागाळापर्यंत शासनाच्या योजना पोहोचवेल. यावेळी रमण खुळे, शिवसेनेचे संघटक भगीरथ पवार, सुनील पोटे, बाबासाहेब मुसमाडे, योगेश जाधव, पोपट शिरसाठ, सुनील शेलार, राहुल चोथे, अशोक शेळके, उपसरपंच एकनाथ खुळे, विजय आढाव, ऋषिकेश आढाव, विजय बनकर, राजूभाऊ मकासरे, प्रकाश खुळे, भाऊराव आढाव, काका आढाव, नरेंद्र तोगे आदींसह शिवसैनिक उपस्थित होते .

Related Articles

Back to top button