अहमदनगर

माजी आ. कर्डीले व ना. तनपुरेंच्या श्रेयवादात मतदार संघातील प्रलंबित प्रश्नाकडे दुर्लक्ष – सुरेशराव लांबे पाटील

राहुरी शहर/ अशोक मंडलिक : राहुरी विधानसभा निवडणुकीपूर्वी राहुरी नगर पाथर्डी मतदार संघातील माजी आ. शिवाजीराव कर्डीले यांनी मतदारसंघात अनेक कामे मंजुर करुन घेतली होती. परंतु त्यांचा अनपेक्षित पराभव झाल्यानंतर ना. प्राजक्त तनपुरे अनपेक्षित निवडुन आल्याने दोघांनाही धक्काच बसला. एकाला आनंदाचा तर दुसर्‍याला दुखाचा! त्यामुळे दोघेही जनतेचे अनेक प्रलंबित प्रश्नावर लक्ष न देता एकमेकांवर टिका टिप्पणी करण्यात व्यस्त असल्याचा आरोप प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष सुरेशराव लांबे पाटील यांनी केला आहे.
मागील दोन वर्षांपासुन अतिवृष्टी व गारपीटीमुळे शेतातील कांदा, कापुस, सोयाबीन, जनावरांची चारा पिके उपळुण गेली व त्यातुन वाचलेल्या शेतमाल व दुधाला कोरोना महामारीतील सततच्या लाॅकडाऊन अशा सर्व कारणांमुळे कवडीमोल भाव मिळाला व अतिवृष्टीत धरणे पुर्ण क्षमतेने भरलेली असतानाही केवळ नियोजनाअभावी संपुर्ण रब्बी हंगाम संपत आल्यानंतर पाणी सोडण्यात आले. गेल्या विधानसभा निवडणुकीत ना. तनपुरे व माजी आ. कर्डीले यांनी जायकवाडी व बिड पाणी प्रश्न, भागडाचारी, राहुरी ग्रामीण रुग्णालय, मुळा धरण व विद्यापीठ प्रकल्पग्रस्त यांना नोकरी, पिण्याच्या पाणी योजना, एस टी डेपो, रस्ते, शेतकऱ्यांना मोफत व पुर्ण दाबाने विज पुरवठा करणे, राहुरी एमआयडीसी, सुशिक्षीत बेरोजगार तरुणांना उद्योग व रोजगार त्याचबरोबर उच्च शिक्षणाचे काॅलेजेस स्थानिक पातळीवर उपलब्ध करून देऊ, शेतकऱ्यांना शासनाकडुन अनुदान मिळवुन देऊ असे भाषनातुन मतदार संघातील जनतेला प्रलोभने दाखवुन शेवटी माजी आ कर्डीलेंचा पराभव करत ना. तनपुरेंनी सत्ता मिळवली. तनपुरे नगराध्यक्ष असताना मागील आमदार व सरकारवर जे आरोप करत होते, ते प्रश्न आजही प्रलंबित असताना त्यांना आज शेतकरी व सर्वसामान्य जनतेच्या प्रलंबित प्रश्नांचा विसर पडला आहे का? त्यांनी टिकाटिपणी न करता निवडणुकीतील आश्वासनाची पुरतात करावी, असा सल्लाही श्री लांबे यांनी ना. तनपुरेंना दिला आहे.
माजी आ. कर्डीले यांचे केंद्रात तर ना. तनपुरेंचे राज्यात सरकार आहे. तरी त्यांनी राहुरी तालुक्यातील 19 गावातुन जात असलेला सुरत हैदराबाद ग्रीनफीड महामार्ग व 10 गावातुन जात असलेली इंडीयन ऑइल पेट्रोलियम कंपनीची भुमीगत पाईपलाईन यांमध्ये जात असलेल्या बागायत जमीनीचा योग्य मोबदला शेतकऱ्यांना न मिळताच पोलीस प्रशासनाचा वापर करुन शेतकऱ्यांच्या जमिनी हस्तगत करण्यात येत आहेत. महात्मा फुले कृषी विद्यापीठ व मुळा धरण प्रकल्पग्रस्त यांचे प्रश्न व राहुरी ग्रामीण रुग्णालय, सुशिक्षीत बेरोजगार, एमआयडीसी, राहुरी एस टी डेपो व तालुक्यातील सर्व सामान्य शेतकऱ्यांचे उभे असलेले ऊस व तोडलेल्या ऊसाला एफआरपी प्रमाणे भाव असे अनेक प्रलंबित प्रश्नावर माजी आ कर्डीलेंनी त्याच्यामधे त्या ठिकाणी लक्ष द्यावेत.
देशाचे माजी कृषीमंत्री शरदचंद्रजी पवार, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व ऊर्जा राज्यमंत्री ना. तनपुरेंनी तेलंगण राज्याचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांचा आदर्श घ्यावा व शेतकऱ्यांना 24 तास मोफत वीज द्यावी. नुसतेच बैठका घेऊ नये, असा टोलाही श्री लांबे यांनी लगावला आहे. या सर्व प्रश्नांची सोडवणूक न केल्यास शेतकरी व सर्व सामान्य जनतेला बरोबर घेऊन ना. बच्चुभाऊ कडु साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली येणाऱ्या काळात भव्य असे आंदोलन उभारले जाईल व जिल्हा परिषद व पंचायत समिती तसेच नगरपालिकेच्या निवडणुकीत शेतकरी व सर्वसामान्य नागरिक तुम्हाला तुमची जागा नक्कीच दाखवतील असा ईशारा प्रहार जनशक्ती पक्षाचे राहुरी तालुकाध्यक्ष सुरेशराव लांबे पाटील यांनी बोलताना दिला आहे.

Related Articles

Back to top button