अहमदनगर

जिल्हा मजूर फेडरेशनच्या संचालकपदी कानवडे

संगमनेर शहर प्रतिनिधी : महसूल मंत्री ना. बाळासाहेब थोरात यांचे आक्रमक कार्यकर्ते म्हणून ओळख असलेले संगमनेर पंचायत समितीचे माजी सदस्य नानासाहेब कानवडे यांची जिल्हा मजूर फेडरेशनच्या संचालकपदी निवड करण्यात आली आहे.
गेल्या काही वर्षांपासून कुठलेही पदभार नसताना नानासाहेब कानवडे यांनी त्यांच्या आक्रमक शैलीत तालुक्यात पक्ष बांधणीसाठी काम केले. या गोष्टींची दखल घेत ना. बाळासाहेब थोरात यांनी त्यांच्यावर नवी जवाबदारी सोपवली आहे. या निवडीचे तालुक्यात सर्वत्र कौतुक होत आहे. या निवडीचे विधानपरिषद सदस्य डॉ. सुधीर तांबे, कारखाना संचालक इंद्रजितभाऊ थोरात, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे, युवक काँग्रेस, विद्यार्थी काँग्रेस संगमनेर च्या वतीने अभिनंदन करण्यात येत आहे.

Related Articles

Back to top button