अहमदनगर

शिक्षक भारतीच्या नेवासा तालुकाध्यक्षपदी भुसारी तर कार्याध्यक्षपदी काळे

राहुरी विद्यापीठ प्रतिनिधीशिक्षक आमदार कपिल पाटील व शिक्षक भारतीचे राज्यध्यक्ष अशोक बेलसरे यांच्या मार्गदर्शनाखालील शिक्षक भारतीच्या अहमदनगर जिल्हा कार्यवाहक व नेवासा तालुका अध्यक्षपदी सुदामराव मते पाटील विद्यालय, गोगलगाव ता. नेवासा चे शिक्षक संजय भुसारी यांची तर कार्याध्यक्ष म्हणून अहमदनगर जिल्हा माध्यमिक सोसायटीचे माजी व्हाईस चेअरमन व संचालक ज्ञानेश्वर काळे यांची निवड तसेच जिल्हा कार्यवाह म्हणून शेवगाव तालुकाध्यक्ष कैलास जाधव यांची निवड शिक्षक भारतीचे जिल्हाध्यक्ष आपासाहेब जगताप यांनी अहमदनगर जिल्हा कार्यकारिणीच्या ऑनलाइन मीटिंग मध्ये जाहीर केली.

सभेच्या अध्यक्षस्थानी शिक्षक भारतीचे राज्य सचिव सुनील गाडगे हे होते. यावेळी शिक्षक भारतीचे नवनिर्वाचित अध्यक्ष संजय भुसारी यांनी सांगितले की, आमदार कपिल पाटील व राज्य अध्यक्ष अशोक बेलसरे यांना 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त व नंतर 100 टक्के अनुदानावर आलेल्या कर्मचाऱ्यांसाठी जुनी पेन्शन लागू करावी, यासाठी शासनावर दबाव आणण्यासाठी आग्रह करणार असल्याचे सांगितले. तसेच लवकरच नेवासा तालुका सर्वसमावेशक कार्यकारिणी जाहीर करणार असल्याचे यावेळी सांगितले. नवनिर्वाचित पदाधिकारी यांचे कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक भारती युनिटकडून उच्च माध्यमिक विभागाचे सरचिटणीस महेश पाडेकर यांनी अभिनंदन केले.

विजय कराळे, जितेंद्र आरु, बाबासाहेब लोंढे, अशोक आव्हड, उपाध्यक्ष सिकंदर शेख, मोहम्मद समी शेख, हनुमंत रायकर, सुदाम दिघे, नवनाथ घोरपडे, संभाजी पवार, सोनवणे केडी, पाथर्डी तालुकाध्यक्ष संतोष शेंदुरकर, सोमनाथ बोंतले, योगेश हराळे, मार्गदर्शक त्रिमूर्तीचे प्राचार्य सोपानराव काळे, राम कर्जुले, शेवगाव तालुकाध्यक्ष कैलास जाधव, सचिव मुकुंद अंचवले, राम कर्जुले, तुकाराम फटांगरे, जयंत पाटील, गोरक्ष शिंदे, सुनील इंगळे, नानासाहेब काटे, नानासाहेब घुले, पोपट औटी उपस्थित होते.

Related Articles

Back to top button