अहमदनगर

हरिगाव मतमाउली जन्मोत्सवाचा शुभारंभ संपन्न

श्रीरामपूर/बाबासाहेब चेडे : तालुक्यातील हरिगाव मतमाउली भक्तिस्थान येथे मतमाउली यात्रा ( जन्मोत्सवाचा ) शुभारंभ बुधवारी १ सप्टेंबर रोजी फा.ऐरल फर्नांडीस एस जे यांच्या शुभहस्ते व प्रमुख धर्मगुरू सुरेश साठे,डॉमनिक रोझारिओ,सचिन मुन्तोडे,रिचर्ड अंतोनी,टेरेन्स आदींच्या उपस्थितीत ध्वजारोहणाने संपन्न झाला.
प्रारंभी प्रमुख धर्मगुरू सुरेश साठे व प्रमुख अतिथी फा.ऐरल फर्नांडीस यांच्या हस्ते पवित्र मारीयेच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.याप्रसंगी फा ऐरल फर्नांडीस यांनी पवित्र मारिया विश्वासाची राणी”या विषयावर तिची महती वर्णन केली व सांगितले की पवित्र मारीयेविषयी काही सांगायचे आहे तर तिची श्रद्धा ज्या विषयी मला सांगायचे आहे जेंव्हा देवदूत गाब्रीयल मारियाकडे येतो आणि तिला सांगतो की देवाची आई तू होणार आहेस तर मारिया फक्त हो सांगत नाही. परंतु देवदूताला सांगते ती देवाच्या इच्छेप्रमाणे माझ्या हृदयामध्ये होवो, समजा की आम्ही सुद्धा पवित्र मरीयेसारखे देवाला नेहमी सांगतो की, तुझ्या इच्छेप्रमाणे आमच्या जीवनामध्ये होवो, तर आम्ही सुद्धा तिच्याव्दारे येशूला पुन्हा पुन्हा जन्म देऊ शकतो. यासाठी आपण प्रार्थना करू या त्यासाठी पवित्र मरीयेची मध्यस्थीसाठी प्रार्थना करू.
त्याचप्रमाणे दोन वर्षापासून सुरु असलेल्या कोरोना महामारीतून सर्वाना मुक्त कर आदी व पवित्र मारियाच्या जीवनावर महत्वपूर्ण प्रवचन फा.ऐरल फर्नांडीस एस जे यांनी केले. येत्या २ सप्टे रोजी सात संस्काराची ओळख या विषयावर फा.भाऊसाहेब संसारे एस जे पुणे यांचे प्रवचन होईल, ३ सप्टे स्नानसंस्कार विषयावर फा.अमृत फोन्सेका यांचे, ४ सप्टे-प्रायश्चित्त संस्कार या विषयावर प्रकाश भालेराव, ५ सप्टे-लग्नसंस्कार-फा,विलास सोनावणे, ६ सप्टे-ख्रिस्तशरीर संस्कार-फा.आशिष म्हस्के, ७ सप्टे-गुरुदीक्षा संस्कार- फा प्रमोद बोधक, ८ सप्टे-पवित्र मारीयेचा जन्मदिवस –फा.रॉक अल्फान्सो, ९ सप्टे-दृढीकरण संस्कार-फा.थोमस डिकोस्टा, १० सप्टे रुग्नाभ्यंग संस्कार-फा.संतोष साळवे, व ११ सप्टे रोजी मतमाउली जन्मोत्सव दिनी प्रमुख अतिथी नासिक धर्मप्रांत महागुरुस्वामी लूरडस डांनियल यांचे सणाच्या दिवशी मुख्य प्रवचन दुपारी १२ वा.होणार आहे. हे सर्व कार्यक्रम कोविड १९ विषाणू प्रादुर्भाव वाढत असल्याने सर्व भक्त गणांची सुरक्षा लक्षात घेता ऑनलाईन भाविकांना घरबसल्या यु ट्यूब प्रसारमाध्यमाव्दारे दर्शन व लाभ घेता येईल. त्यासाठी मतमाउली भक्तिस्थान वर प्रसारित होणार आहे त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन हरिगाव प्रमुख धर्मगुरू सुरेश साठे यांनी आवाहन केले आहे.

Related Articles

Back to top button