अहमदनगर
पवार, बागुल, चेडे यांना राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्कार
श्रीरामपूर प्रतिनिधी : जय मल्हार शैक्षणिक व बहुउद्देशीय सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने विविध क्षेत्रामधे उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींचा, भगिनींचा विविध मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ, प्रमाणपत्र, आकर्षक गौरव चिन्ह देऊन सत्कार करण्याचे आयोजन संस्थापक अध्यक्ष कांतीलाल महादेव जाडकर यांनी केले असून भूमी फाउंडेशन संस्थापक कैलास पवार यांना सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल अहिल्याबाई होळकर राज्यस्तरीय जीवनगौरव पुरस्कार, भिमराज बागुल यांना आरोग्यमित्र सेवाबद्दल अहिल्याबाई होळकर राज्यस्तरीय जीवनगौरव पुरस्कार तसेच बाबासाहेब चेडे यांना पत्रकारिता क्षेत्रातील कार्याबद्दल अहिल्याबाई होळकर राज्यस्तरीय जीवनगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आले आहे. त्याबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.