अहमदनगर

भाजपचा शंखनाद जणु गोरगरीबांचा बळी घेण्यासाठीचं ? – श्रीकांत मापारी

शिर्डी प्रतिनिधीराज्यात भारतीय जनता पक्षाच्या वतीने मंदिर उघडण्यासाठी ठिकठिकाणी शंखनाद आंदोलन सुरु आहे. मुळतः आज राज्यात कोरोनो वर नियंत्रण घालण्यात राज्य सरकारला यश आले आहे. ठिकठिकाणी डेल्टाचे रुग्ण आढळून येत आहे. तज्ज्ञांकडून तिसऱ्या लाटेची भिती व्यक्त केली जात असून राज्य सरकार त्यावर खबरदारी म्हणून प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत नियोजन करत आहे. त्यासाठी राज्य सरकारला सहकार्य करण्याऐवजी राज्यातील भाजप राज्य सरकारला आर्थिक आडचणीत आणण्यासाठी मंदिरे उघडण्यासाठी शंखनाद सारखे आंदोलन करत असल्याचा आरोप अ.नगर जिल्हा काँग्रेस चे सरचिटणीस श्रीकांत मापारी यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे केला आहे.


वास्तविक पाहता अजुन ही राज्यातील कोरोनो व डेल्टा आजाराची परिस्थिती चिंताजनक आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकार गोरगरीब जनतेचा बळी जाऊ नये म्हणून सर्वतोपरीने प्रयत्नशील आहे. या आजाराने अनेक गोरगरीब जनसामान्यांचे बळी गेलेले आहे. अनेक कुटुंबचे कुटुंब उध्वस्त झाले आहे. गोरगरीब जनता आजारपणाच्या वैद्यकीय बाबी मुळे मोठ्या आर्थिक अडचणीत असुन कर्जबाजारी झाले आहे. अनेक महाभागांनी कोरोनोत गोरगरीब आधार देण्याऐवजी अडचणीत असताना स्वतःचे चांगभले करुन घेतले आहे. गोरगरीबांना त्याचे जिने असाह्य झाले असताना त्याकडे प्रकर्षाने दुर्लक्ष करुन गोरगरीबांच्या सरणावर स्वतःची राजकीय पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न राज्यातील भा.ज.प करित असल्याचा आरोप त्यांनी केला.
आजही कोरोनाचा फैलाव होऊ नये यासाठी खबरदारी म्हणून राज्यातील सर्व शाळा बंद आहे. विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान झाले आहे. त्याच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. विद्यार्थी व त्याचे पालक मोठ्या चिंतेत आहे, याकडे लक्ष द्यायला वेळ नाही. मात्र मंदिर उघडायला शंखनाद सुरु आहे. ही मोठी शोकांतिका आहे. गोरगरीब जनतेला आधार देण्याची गरज आहे. जनता या महाआजाराने भयभीत झाली आहे. त्याच्या दोन वेळच्या पोटाची खळगी भरण्याची पंचायत झाली असताना लाखो रुपये कोरोनोच्या आजारातुन बाहेर पडण्यासाठी गेलेले असताना पुन्हा शंखनाद करुन जणु गोरगरीबांचा बळी घेण्याचाचं प्रयत्न राज्यातील भाजप करते की काय असा प्रश्न आज सर्व सामान्य जनतेला पडत असल्याचे श्रीकांत मापारी यांनी म्हटले आहे.

Related Articles

Back to top button