अहमदनगर
कामगारांना न्याय मिळत नाही तोपर्यंत मी कामगारांसोबत – पवार
राहुरी प्रतिनिधी : राहुरी कारखाना येथे कामगारांच्या विविध प्रकारचे तीव्र व सामुहिक आंदोलनाला सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब पवार यांनी भेट दिली.
कामगारांचे विविध प्रश्न समजून घेऊन त्यांचे प्रश्नांबाबत असलेली तळमळ, कामगारांच्या व्यथा लक्षात घेता कामगारांचे होत असलेले हाल, हे उघड्या डोळ्यांनी बघवत नाहीत. आज त्या कामगारांना मागील आणि आताचे पगार कारखान्याकडे शिल्लक आहेत. त्या कामगारांचे प्रपंच चालणार तरी कसे, त्यांच्या अनेक प्रश्नांची उत्तरे तशीच राहून जातात. त्यामुळेच त्यांना जोपर्यंत तुम्ही सहन करू शकाल तोपर्यंत आंदोलन चालू ठेवा ज्या वेळेला तुम्ही थकले आहात असे वाटले तर मला आवाज द्या, मी निम्म्या रात्री आपणास सोबत आहे. प्रशासनाने लवकर निर्णय न घेतल्यास कामगार बांधवांच्या प्रश्नांवर आमरण उपोषण ही करणार असल्याचे दादासाहेब पवार यांनी सांगितले.