शिक्षणवारी ज्ञान पंढरी

सत्यानिकेतन संस्थेच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

अकोले प्रतिनिधी : सत्यानिकेतन संस्थेच्या वतीने १० वी व १२ वी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व गुणगौरव समारंभ गुरुवर्य रा.वि. पाटणकर सर्वोदय विद्या मंदिर राजूर विद्यालयात पार पडला. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष ॲड. एम.एन. देशमुख होते.राजूर येथील सत्यानिकेतन संस्थेअंतर्गत विद्यालय, आश्रम शाळा, कनिष्ठ महाविद्यालयातील १० वी व १२ वी प्रथम तीन क्रमांक मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
 
यावेळी सत्यानिकेतन संस्थेचे सचिव तथा मा. प्राचार्य टी.एन. कानवडे, सह सचिव मिलिंदजी उमराणी, कोषाध्यक्ष विवेकजी मदन, मुठे एम.एल. मुंबई विद्यापीठ क्रीडा विभाग संचालक अशोक मापुसकर, चिमणराव देशमुख, अशोक मिस्त्री, एन.डी. बेल्हेकर, एस.टी. येलमामे, अॅड. एम.एन. देशमुख महाविद्यालय प्राचार्य बी.वाय. देशमुख, सर्वोदय विद्या मंदिर प्राचार्य एम.डी. लेंडे, प्राचार्य एल.पी. पर्बत, प्राचार्य अंतुराम सावंत, शिंदे एस. के. एस.डी. साबळे, माजी प्राचार्य एम. के. बारेकर, विलास पाबळकर, विजय पवार, काठे, बी.एन. ताजणे उपस्थित होते. तसेच सर्व शिक्षक व शिक्षिकेत्तर कर्मचारी व पालक उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत सचिव तथा मा. प्राचार्य टी.एन. कानवडे यांनी केले. सूत्रसंचालन डी. बी. पगारे यांनी केले तर आभार सहसचिव मिलिंदजी उमराणी यांनी मांडले.

Related Articles

Back to top button