महाराष्ट्र

कपड्यात मिळालेले 30 हजार केले परत

परभणी/ रघुनाथ भोसलेड्रायक्लीनीकसाठी ग्राहकाने आणुन टाकलेल्या कपड्यांमध्ये मिळालेले 30 हजार रूपये परत देत खराटे यांनी एक प्रकारे माणुसकीचे दर्शन घडविले आहे.


शहरातील संतोष खराटे यांचा ड्रायक्लीनींगचा व्यवसाय आहे, त्याच्याकडे आजु बाजुच्या परीसरतील नागरीक कपडे ड्रायक्लीनींगसाठी टाकतात, MH 22 DRYCLEANERS अशा नावाने शहरातील वृंदावन काॅलनी मध्ये प्रसिद्ध आहे, सर्वांचं एक अनोखं विश्वासाचं नातं अगोदरच होतं. पण या आगळ्या-वेगळ्या नात्याला आज पुन्हा एकदा उजाळा मिळाला.

हिंद टायर्स, हुसैन टॉवर, गंगाखेड रोड, परभणी यांचे कपडे वॉश करत असताना पँट मध्ये 30,000 रुपये आहेत असे समजले असता, त्याच वेळी हिंद टायर्स यांना फोन करून बोलावून त्यांची नगद रक्कम 30,000 रूपये त्यांना परत करताना MH 22 DRYCLEANERS चे सहकारी दिसत आहेत.

Related Articles

Back to top button