अहमदनगर

प्रवरेच्या पावनभुमीत सहकाराचे बीज पद्मश्री विखे पा. यांनी रूजविले : प्रा. डॉ. निर्मळ


चिंचोली प्रतिनिधी : प्रवरेच्या पावन भुमीत सहकाराच्या यज्ञाचे बीज रोवण्याचा व ते रुजविण्याचा प्रयत्न पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटलांनी केला नि तो राज्यभर गेला. त्यामुळे सर्वसामान्य शेतकरी व कष्ककऱ्यांना त्याचा फायदा झाला. कोणतीही व्यक्ती ज्या समाजात, वातावरणात जन्माला आली. त्या सर्वांना सामावून घेण्याचं बळ अंगी हवं, त्यासाठी सतत संघर्षशील राहणं, नेहमी प्रयन्तवादी राहाणं, वास्तवात आणनं हे सामर्थ्य पद्मश्रीमध्ये होतं. सहकाराच्या क्रांतीला खऱ्या अर्थाने प्रवरेतून सुरुवात झाली. विद्यार्थ्यांनी आपल्या आयुष्यात नेहमी संघर्षरत राहणं हीच खरी पद्मश्रींना त्यांच्या जयंतीदिनी खरी मानवंदना ठरेल असे प्रतिपादन प्रा. डॉ. एकनाथ निर्मळ यांनी केले.

पद्मश्री विठ्ठलराव विखे पा. यांच्या शासनाने जाहीर केलेल्या जयंतीच्या शेतकरी दिनानिमित्ताने आयोजित चिंचोली येथील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या स्व. जनार्दन काळे माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते दिलीप दाढकर तर व्यासपीठावर सरपंच गणेश हारदे, शाळा विकास समितीचे अध्यक्ष गणेश लाटे, सर्जेराव लाटे, बाळासाहेब लाटे, संभाजी आरगडे, विनोद काळे, सुधाकर पठारे प्राचार्य तांबे उपस्थित होते.
पुढे बोलताना प्रा. कोबरणे म्हणाले आयुष्यात सर्वजण नेहमी विद्यार्थी असतात. त्यामुळे आयुष्यभर शिकण्यासारख खूप असत फक्त त्यासाठी आत्मसमर्पीत असणं गरजेच असून सतत प्रयत्नशील असण्याचं आवाहन त्यांनी प्रसंगी करत हीच पद्मश्रींना खरी मानवंदना ठरेल असे सांगितले. नैसर्गिक नंदन वनाबरोबरच शैक्षणिक नंदनवन हे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय व्हावं अशीही अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. प्रसंगी विद्यालयाने पद्मश्री जयंतीनिमित्त सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. या सप्ताहात विविध प्रकारच्या स्पर्धा भरविण्यात आल्या होत्या. त्यातील विशेष प्राविण्य प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.
प्रसंगी सरपंच हारदे, सर्जेराव लाटे, प्रा. तांबे आदिंची समयोचित भाषणे झाली प्रास्ताविक गोरे सरांनी केले तर आभार प्रदर्शन निर्मळ सरांनी मानले. कार्यक्रमाला विद्यार्थी पालकांसह बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.

Related Articles

Back to top button