अहमदनगर

‘ अंत्यविधीला ‘ विरोध करणाऱ्यावर कारवाई करा

डॉ बाबासाहेब आंबेडकर सोशल फोरम महाराष्ट्र राज्य, काँग्रेस अनुसूचित जाती विभाग,अल्पसंख्याक काँग्रेस विभाग आदी संघटनेच्या वतीने उपविभागीय अधिकारी अनिल पवार यांना निवेदन देण्यात आले.


चिंचोली प्रतिनिधी : सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील मौजे माळेवाडी (बोरगाव) या ठिकाणी मागासवर्गीय मातंग समाजातील मृतांच्या पार्थिवाची विटंबना करून स्मशान भूमीत अंत्यविधी करण्यास विरोध करण्यात आला. असे कृत्य करणाऱ्या समाजकंटकांवर कारवाई करावी, अशी मागणी डॉ बाबासाहेब आंबेडकर सोशल फोरम महाराष्ट्र राज्य, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभाग, महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक ख्रिस्ती विकास परिषद या संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.

याबाबत (दि.२४) उपविभागीय अधिकारी अनिल पवार यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की मागासवर्गीय मातंग समाजातील मृतदेहाची विटंबना करून स्माशान भूमीत अंत्यविधी करण्यास विरोध केला. हा केवळ जातीयद्वेषातुन करण्यात आला आहे. माणुसकीला काळिमा फासणारी व पुरोगामी महाराष्ट्राला शरमेने मान खाली घालायला लावणारी अशी ही संतापजनक घटना आहे. ज्या जातीयवाद्यांनी हे कृत्य केले आहे.त्याच्यावर कठोरातील कठोर कारवाई करून शासन मागणी डॉ बाबासाहेब आंबेडकर सोशल फोरम, काँग्रेस अनुसूचित जाती विभागाच्या वतीने करण्यात आली.

निवेदनावर डॉ बाबासाहेब आंबेडकर सोशल फोरमचे जिल्हाध्यक्ष तथा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभाग समन्वयक संजय भोसले, आल्पसंख्याक काँग्रेसचे जिल्हा सचिव तथा फोरमचे उपाध्यक्ष दिपक कदम, श्रीरामपूर तालुका काँग्रेस अनुसूचित जाती विभाग अध्यक्ष सुभाष तोरणे, डॉ बाबासाहेब आंबेडकर सोशल फोरमचे जिल्हा सचिव प्रकाश भिगारदिवे, जिल्हा अल्पसंख्याक काँग्रेस विभागाचे सरचिटणीस नवाजभाई जाहागिरदार, फोरमचे श्रीरामपूर तालुका उपाध्यक्ष किरण घोलप, बाबा साठे, अनुसंगम शिंदे, ख्रिस्ती विकास परिषदचे सुधिर भोसले, संदेश दीवे, उमेश साठे, काँग्रेस अनुसूचित विभागाचे सर्वश्री प्रदेश समन्वयक बंन्टी यादव, शिवाजीराव जगताप, नामदेव चादणे आदि उपस्थित होते.

Related Articles

Back to top button