अहमदनगर

समाजहितासाठी कार्य करणाऱ्यांना प्रोत्साहान देण्याचे कार्य करणार – रमेश खेमनर

राहुरी येथे दिशाशक्ती मीडिया समूहाच्या वतीने राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा संपन्न

राहुरी | जावेद शेख : महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथील डॉ.आण्णासाहेब शिंदे सभागृह येथे दिशाशक्ती मीडिया समूहाच्या वतीने राज्यातील वैद्यकीय, प्रशासकीय, सहकार, सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक, उद्योग, कृषी, पत्रकारिता, आरोग्य, अध्यात्मिक, पर्यावरण आदी क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या संस्था व मान्यवर व्यक्तींच्या विशेष कार्य सन्मान करून भावी वाटचालीस तसेच उल्लेखनीय कार्य करण्यासाठी प्रेरणा मिळण्यासाठी दिशाशक्ती मीडिया समूहाच्या वतीने शनिवार दि. ८ जून रोजी राज्यस्तरीय पुरस्काराचे आयोजन करण्यात आले होते.

सदरील कार्यक्रम हा महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथील डॉ.आण्णासाहेब शिंदे सभागृहात नुकताच संपन्न झाला. या कार्यक्रमाचे आयोजन दिशाशक्ती मीडिया समूहाचे कार्यकारी संपादक रमेश खेमनर यांनी केले होते. या कार्यक्रमास शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष पै. रावसाहेब खेवरे, रासपचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष शरद बाचकर, राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती डॉ आण्णासाहेब बाचकर, यशवंत सेना जिल्हा प्रमुख विजयराव तमनर, कृषी विद्यापीठाचे सुरक्षा अधिकारी गोरक्षनाथ शेटे, रामदास बाचकर, मधुकर घाडगे, मा. सरपंच ज्ञानेश्वर बाचकर, सचिन कोळपे, उमेश बाचकर, दिशाशक्ती मीडिया समूहाचे संपादक बाळकृष्ण कोकाटे, आयोजक व कार्यकारी संपादक रमेश खेमनर, उप संपादक इनायत अत्तार आदींची प्रमुख उपस्थिती होती.

या प्रसंगी गंगासागर पोकळे, प्रमोद डफळ, वसंत रांधवण, युवा ग्रामीण पत्रकार संघांचे नाशिक विभागीय अध्यक्ष शरद तांबे पाटील, जिल्हा सचिव बाळकृष्ण भोसले, पत्रकार आर. आर.जाधव, राजेंद्र म्हसे, राजेंद्र पवार, शरद पाचारणे, मनोज साळवे, कृष्णा गायकवाड, सचिन पवार, ज्ञानेश्वर सुरशे, गजानन सरकटे, विशाल फीतवे व शिक्षक आबा अहिरे त्याचप्रमाणे राज्यातून विविध क्षेत्रातून आलेले पुरस्कार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्र संचालन आप्पासाहेब ढोकणे यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन संपादक बाळकृष्ण कोकाटे यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठ व युवा ग्रामीण पत्रकार संघाचे मोलाचे सहकार्य लाभले.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button