अहमदनगर

प्रा. शेलार डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्काराने सन्मानित

राहुरी | जावेद शेख : सामाजिक क्षेत्रात विशेष उल्लेखनीय काम केल्याबद्दल शासनाच्या वतीने दिला जाणारा डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयाचे प्रा. बाबासाहेब शेलार यांना प्रदान करण्यात आला. जमशेटजी भाभा नाट्यगृह, नरिमन पॉइंट, मुंबई येथे भव्य शासकीय सोहळा नुकताच संपन्न झाला.

राज्याचे सामाजिक न्याय व क्रीडा युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांचे कडून पुरस्कार स्विकारताना प्रा.बाबासाहेब शेलार सोबत सौ.स्मिता शेलार, कु.अनुष्का शेलार, संजयकुमार शिंदे, रवींद्र शेलार तसेच यावेळी राज्याचे मुख्य सचिव श्री.भांगे, बार्टीचे व्यवस्थापकीय संचालक सुनील वारे, प्रशासकीय अधिकारी व मान्यवर उपस्थित होते. समाजभूषण पुरस्काराबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button