अहमदनगर

आगामी निवडणुकांमध्ये कॅम्पस अँबेसिडरची भूमिका महत्वाची : प्रांताधिकारी सावंत पाटील

श्रीरामपूर : कार्यशाशाळेत नोडल अधिकारी व कॅम्पस अँबेसिडर यांच्या समवेत प्रांताधिकारी किरण सावंत पाटील, तहसीलदार मिलिंदकुमार वाघ व निवडणूक कर्मचारी वृंद

राहुरी | जावेद शेख : आगामी वर्षात लोकसभा, विधानसभा व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुका या क्रमाने होणार असून या काळात निवडणूक आयोगाचा पथदर्शी उपक्रम असलेल्या स्वीप संकल्पेमार्फत मतदारांचे पद्धतशीर शिक्षण आणि निवडणूक सहभाग वाढविण्यासाठी महाविद्यालयांत कॅम्पस अँबेसिडरची नेमणूक केली आहे. मतदारांमध्ये जागरुकता वाढविणे, युवा मतदार, महिला मतदार, दिव्यांग मतदार, तृतीयपंथी मतदार यांची मतदार नोंदणी वाढविणे याकामी कॅम्पस अँबेसिडरची भूमिका अत्यंत महत्वाची असल्याने आजच्या कार्यशाळेत होणारे प्रशिक्षण पुढील काळात गावपातळीवर काम करण्यासाठी निश्चीतच फायदेशीर ठरेल असे प्रतिपादन श्रीरामपूर विभागाचे प्रांताधिकारी किरण सावंत पाटील यांनी केले.

निवडणूक शाखेमार्फत आयोजित कॅम्पस अँबेसिडर कार्यशाळा वर्गाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी तहसीलदार मिलिंदकुमार वाघ यांनी महाविद्यालयांचे नोडल अधिकारी व कॅम्पस अँबेसिडर यांना मार्गदर्शन करताना म्हंटले कि, मतदानाच्या दिवशी कोणत्याही प्रलोभानास बळी न पडता मतदारांना जागृत करणे, चौकांमध्ये मतदारांबरोबर बैठक, सामुहिक चर्चा करून मतदानासाठी लाच घेऊन मतदान केल्याचे दुष्परिणाम मतदारांना अवगत करणे, मतदानाच्या दिवशी क्षेत्रीय अधिकारी, जेष्ट नागरिक, सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांच्या बरोबरीने नैतिक मतदानाबाबत संदेश, जाहिराती, भित्तीपत्रके प्रसारित करणे, मतदानाच्या वेळी महाविद्यालयांचे स्वयंसेवक यांच्या मदतीने घरोघरी जाऊन मतदान करणेसाठी जनजागृती करण्यासाठी प्रयत्न करावेत.

श्रीरामपूर मतदारसंघाचे स्वीप समन्वयक गणेश पिंगळे यांनी कॅम्पस अँबेसिडर यांना प्रशिक्षण दिले. याप्रसंगी निवडणूक नायब तहसीलदार हेमलता वाकडे, महसूल सहायक ओम खुपसे, संदीप पाळंदे, ज्ञानेश्वर छल्लारे, नरेंद्र चव्हाण, प्रितेश तांदळे, ज्ञानेश्वर गायकवाड, विजय भगत यांनी कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतली.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button