अहमदनगर

राहुरी येथे मराठा आरक्षणाचा जल्लोष

राहुरी – गेल्या अनेक वर्षांपासून मराठा आरक्षणासाठी महाराष्ट्रात मोठ्या संख्येने आंदोलने चालू होती. याच आंदोलनाचा भाग म्हणून मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखालील आंदोलनाला यश मिळाल्याबद्दल राहुरी येथे मराठा एकीकरण समितीच्या वतीने फटाके फोडत मिठाई भरवत गुलालाची उधळण करत जल्लोष करण्यात आला.

मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली चालू असलेल्या आंदोलनाची दखल घेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी मराठा समाजाच्या सर्व मागण्या मान्य केल्याचे जाहीर केले आहे. आंदोलनाची दखल घेत महाराष्ट्र सरकारने नोंदी मिळालेल्या सर्व मराठा परिवारास कुणबी प्रमाणपत्र देणे, शिंदे समिती रद्द न करता मुदत वाढ देणे, सगे सोयऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र देणे आदी मागण्या मान्य केलेल्या आहेत. याचा आनंदोत्सव राहुरी येथील छत्रपती चौक येथे मराठा एकीकरण समितीच्या सदस्यांनी एकत्रित येत मोठ्या जल्लोषात साजरा केला.

या प्रसंगी मराठा एकीकरण समितीचे देवेंद्र लांबे म्हणाले की आजपर्यंत मराठा आरक्षण लढ्यात कै.अण्णासाहेब पाटील, कै.अण्णासाहेब जावळे पाटील या मराठा योध्दांसह शेकडो बांधवांनी आपल्या जीवाची आहुती दिली आहे. आज खऱ्या अर्थाने मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात भूतोना भविष्य असा पाठिंबा मिळाला व राज्याचे मुख्यमंत्री यांनी सकारात्मक पाठपुरावा करत मराठा समाजाला आरक्षण दिलेले आहे. या निर्णयाचे स्वागत मराठा समाज मोठ्या जल्लोषात साजरा करत आहे. या निर्णयामुळे मराठा समाजाला मोठा फायदा होणार आहे.

यावेळी आनंदोत्सव साजरा करताना सतीश घुले, संदीप गाडे, महेंद्र शेळके, अशोक तनपुरे, अशोक कदम, विनायक बाठे, राजेंद्र लबडे, मधुकर घाडगे, दादा धसाळ, संभाजी मोरे, विक्रम मोढे, अनिल आढाव, माणिक मगर, भारत भुजाडी, रवींद्र तनपुरे, अक्षय भुजाडी, भिंगारकर राजेंद्र, संकेत उंडे, ऋषी भिंगारकर, हर्षल उंडे, संजय देवरे, दादासाहेब वाबळे, कृष्णा गायके, जालिंदर कोहकडे, दीपक तनपुरे, अमोल रोकडे, रोहित नालकर, नानासाहेब शेटे, किशोर भोंगळ, विजय कोहकडे, बाबासाहेब आंधळे आदींसह मोठ्या संख्येने मराठा बांधव उपस्थित होते.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button