कृषि विज्ञान प्राध्यापक सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी डॉ. निरगुडे व उपाध्यक्षपदी घाडगे यांची निवड
राहुरी विद्यापीठ : महात्मा फुले कृषि विद्यापीठातील कर्मचार्यांची जीवनदायिनी अशी ओळख असलेल्या नामांकित कृषि विज्ञान प्राध्यापक सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी डॉ. रोहित निरगुडे व उपाध्यक्षपदी महेश घाडगे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
सहाय्यक निबंधक कार्यालयातील कार्यालय अधिक्षक के.के. आव्हाड यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ही निवड करण्यात आली. अध्यक्षपदाची सुचना संस्थेचे माजी उपाध्यकक्ष गणेश मेहेत्रे यांनी मांडली. त्यास संस्थेचे माजी अध्यक्ष डॉ. विक्रम कड यांनी अनुमोदन दिले. तसेच उपाध्यक्षपदाची सुचना संस्थेच्या संचालिका श्रीमती भारती बरे यांनी मांडली त्यास संस्थेचे संचालक डॉ. नारायण मुसमाडे यांनी अनुमोदन दिले.
नवनिर्वाचीत अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचे माजी चेअरमन, माजी व्हा. चेअरमन, सर्व संचालक तसेच संस्थेचे सचिव व सर्व कर्मचारी वृंद यांनी अभिनंदन केले. दि. 30 नोव्हेंबर, 2023 अखेर संस्थेचे एकुण 1446 सभासद आहे. विद्यापीठ स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.