अहमदनगर

हरेगाव येथे स्वाभिमान धम्म परिषद

श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : तालुक्यातील हरेगाव येथील स्वाभिमान धम्म भूमी या ठिकाणी दि. १६ डिसेंबर रोजी भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने १४ वी स्वाभिमान धम्म परिषद आयोजित करण्यात आली असून तेथे जाहीर सभा, श्रामणेर बौद्धाचार्य व महिला उपासिका प्रशिक्षण शिबीर होणार आहे.

सकाळी १० वा. ध्वजारोहण, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार, समता सैनिक दलाची मानवंदना, स्वागत व प्रास्तविक अध्यक्ष सुगंधराव इंगळे, एस के भंडारे, सुशील वाघमारे आदींची भाषणे होतील. यावेळी व्यवस्थापक चैत्यभूमी पु.भदंत बी संघपाल महाथेरो, पु.भदंत काश्यप [कोपरगाव], राष्ट्रीय कार्याध्यक्ष भीमराव य.आंबेडकर, राष्ट्रीय उपाध्यक्ष एस के भंडारे, सरचिटणीस म.राज्य सुशील वाघमारे, केंद्रीय शिक्षक सत्येंद्र तेलतुंबडे हे प्रमुख अतिथी व हरिगाव ग्राम शाखा कार्यकारिणीचे संतोष बनसोडे, अशोक बनकर, संजय महाले, दीपक नवगिरे, भाऊसाहेब व्हसाळे तसेच राणीताई मोरे, सरिता पंडित, भावना शिणगारे, शारदा तडके, जिजाबाई बनकर आदी उपस्थित राहणार आहेत.

या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन सरपंच दिलीप त्रिभुवन, ग्रा.प.सदस्य सुनील शिणगारे, रमेश भालेराव, विधिज्ञ किरण खाजेकर, सी एस खरात, बाबुराव सूर्यवंशी, रवी गायकवाड, ग्रामसेवक पी जी आसने आदींनी केले आहे.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button