कृषी

शिरसगाव येथे मधमाशी जनजागृती कार्यक्रम संपन्न

श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : केंद्रीय मधुमक्षिका संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे यांच्याद्वारे व गोदागिरी फार्म आणि बालाजी उद्योग समूह यांच्या मदतीने शिरसगाव येथे एक दिवसीय विनामूल्य मधमाशी जनजागृती कार्यक्रम नुकताच पार पडला.

या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून विजय देशमुख तर अध्यक्ष म्हणून भास्कर ताके उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी शिरसगावातील ग्रामस्थ, न्यू इंग्लिश स्कूल शिरसगाव येथील विद्यार्थी व आर. बी. एन. बी. महाविद्यालयाच्या वनस्पतीशास्त्र व प्राणीशास्त्र विभागाचे शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

कार्यक्रमामध्ये मधमाशी पालक- उद्योजक ऋषिकेश औताडे व सौ अमृता देशमुख यांनी मधमाशी पालन व त्याविषयीची माहिती उपस्थितांना दिली. सदर कार्यक्रमासाठी यू. के. आढाव, एच. जी. चव्हाण, बाबासाहेब कदम, अण्णासाहेब ताके, सोपान गवारे, श्रद्धा देशमुख, बापूसाहेब जाधव, बडाख, गवारे व ग्रामपंचायत शिरसगाव यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button