अहमदनगर

भाजपा किसान मोर्चा उत्तर महाराष्ट्र सचिवपदी थोरात

संगमनेर शहर : भारतीय जनता पक्षाचे नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महाराष्ट्र राज्याचे महसूल, पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वाखाली, भाजपा किसान मोर्चा प्रदेशाध्यक्ष गणेशजी भेगडे यांच्या अध्यक्षतेखाली व मान्यतेने आज प्रदेश भाजपा किसान मोर्चाची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे.

प्रदेश किसान मोर्चाचे प्रभारी व राज्य भाजपचे सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर, तसेच प्रभारी ज्ञानोबाजी मुंडे यांच्या संमतीने कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. या कार्यकारिणीत संगमनेर, जि. अहमदनगर येथील स्व. संभाजीराजे थोरात फाऊंडेशनचे अध्यक्ष रविंद्र संभाजीराव थोरात यांच्या कामाची दखल घेत भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाच्या उत्तर महाराष्ट्र प्रदेश सचिव पदी निवड करण्यात आली आहे. या निवडीचे राजकीय, सामाजिक, शेतकरी, धार्मीक, व्यापारी वर्गातून स्वागत होत आहे.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button