अहमदनगर

जीवनाकडे सकारात्मक आणि निरपेक्ष दृष्टीने पाहिले तर खरे समाधान मिळते – डॉ.राजीव शिंदे 

श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : माझे वडील स्व.ॲड. रावसाहेब शिंदे व आई शशिकलाताई शिंदे 1991 पर्यंत एस.टी. प्रवास करीत होते. शक्य तेवढे पायी चालत असत. साधे जेवण, राहणीमान, त्यांच्या गरजा कमीतकमी होत्या. तोच आदर्श आम्ही परिवार पाळत आहे. जीवनाकडे सकारात्मक आणि निरपेक्ष दृष्टीने पाहण्यातच खरे समाधान असल्याचा अनुभव घेत आहोत, असे मत रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य डॉ. राजीव रावसाहेब शिंदे यांनी व्यक्त केले.

येथील महादेव मळ्यात विश्वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठान, वाचन संस्कृती प्रतिष्ठान, प्राचार्य शेळके मित्रमंडळातर्फे जीवनातील समाधान आणि वाचन या विषयावर चर्चा, डॉ. राजीव शिंदे षष्ठब्दीपूर्ती शुभेच्छा निमित्ताने आयोजित कार्यक्रमात डॉ. राजीव शिंदे बोलत होते. यावेळी डॉ. प्रेरणाताई शिंदे, माजी प्राचार्य टी. ई. शेळके, विश्वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठानचे संस्थापक सचिव सुखदेव सुकळे, प्राचार्य डॉ. शंकरराव गागरे, साहित्यिक डॉ. बाबुराव उपाध्ये, प्रा. शिवाजीराव बारगळ, आरोग्य मित्र सुभाषराव गायकवाड, संकेत बुरकुले आदी उपस्थित होते.

यावेळी डॉ. राजीव शिंदे यांना विविध पुस्तके देऊन वाचनाचा आनंद सत्कार करण्यात आला. ‘आभाळा भिडे हात’ हॆ कै.चंदन मेमन चरित्र, ‘अंधार अंधश्रद्धेचा’ हॆ सद्गुरू श्री वामनराव पै पुस्तक, तसेच डॉ.बाबुराव उपाध्ये यांचे ‘समाजचिंतन’, संपादित ‘विचारवेध’, प्रा. दिलीप सोनवणे लिखित ‘इरसाल नमुने ‘, आरोग्यमित्र सुभाष गायकवाड यांनी ‘संस्था भेट, चर्चा थेट’ अशी पुस्तकॆ, बुके देऊन डॉ. राजीव शिंदे व डॉ. प्रेरणाताई शिंदे यांच्या वैद्यकीय, शैक्षणिक सेवेबद्दल सत्कार करण्यात आला.

डॉ. राजीव शिंदे यांनी वैद्यकीय तसेच कुटुंब जीवनातल्या आठवणी सांगत साधे जीवन जगण्यातच खरे सुख आहे, माणसेच माणसाला मोठेपणा देतात, बाकी आपण शून्य असतो. त्यासाठी संवादी व्हावे, इतरांसाठी काही चांगले करण्यात आता आनंद मिळतो, असे सांगून सर्वांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. उपस्थितांनी मनोगते व्यक्त केली. सूत्रसंचालन डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी केले तर प्रा. शिवाजीराव बारगळ यांनी आभार मानले.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button