ठळक बातम्या

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जनसामान्यांचे नायक – प्रशांत काळे

धनुष्यबाण चिन्हावर आगामी सर्व निवडणुका लढवणार - खा.सदाशिव लोखंडे

राहुरी – शिवसेनेचे जिल्हा निरीक्षक प्रशांत काळे यांच्या राहुरी दौऱ्यानिमित्त व्यंकटेश लॉन्स येथे तालुक्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक शिर्डी लोकसभेचे खा.सदाशिव लोखंडे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच पार पडली.

या प्रसंगी दत्तात्रय दळवी, संपर्क प्रमुख बाळासाहेब पवार, दक्षिण जिल्हा प्रमुख बाबुशेठ टायरवाले, उपजिल्हा प्रमुख अण्णासाहेब म्हसे, जयवंत पवार, अनंतराव शेळके, शशिकांत दिवटे, राहुरी तालुकाध्यक्ष देवेंद्र लांबे, संघटक महेंद्र उगले, संपर्क प्रमुख अशोक तनपुरे, अध्यात्मिक आघाडी प्रमुख संपत जाधव, उपप्रमुख प्रशांत खळेकर, शेतकरी आघाडी प्रमुख किशोर मोरे, शहर प्रमुख गंगाधर सांगळे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

याप्रसंगी शिवसेना पदाधिकारी यांना मार्गदर्शन करतांना निरीक्षक काळे म्हणाले की, शिवसेना पक्ष प्रमुख तथा मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या आदेशाने राहुरी तालुक्यातील कामकाजाचा आढावा घेण्यासाठी प्रत्यक्ष बैठक घेऊन मुख्यमंत्री शिंदे यांच्या माध्यमातून घेतलेले निर्णय व त्या निर्णयांची शासकीय स्तरावर झालेली अंमलबजावणी याची माहिती घेतली जात आहे. तसेच शिवसेना पक्ष संघटन मजबूत करण्याच्या दृष्टीने सर्वत्र बैठका घेतल्या जात असल्याचे श्री.काळे यांनी सांगितले.

या प्रसंगी अध्यक्षीय भाषणात खा.सदाशिव लोखंडे म्हणाले की, आगामी येणाऱ्या सर्व निवडणुका पक्ष प्रमुख तथा मुख्यमंत्री शिंदे यांच्या आदेशाने धनुष्यबाण या चिन्हावर लढवल्या जाणार आहेत. राहुरी तालुक्यात तालुका प्रमुख देवेंद्र लांबे यांच्या कामामुळे शिवसैनिकांमध्ये नवचैतन्य पहावयास मिळत आहे. शिवसैनिकांनी आगामी निवडणुकांसाठी तयारीला लागावे असे श्री.लोखंडे म्हणाले.

या कार्यक्रमास ३२ गाव उपप्रमुख प्रभाकर तुपे, युवा सेना प्रमुख औदुंबर करपे, बाळासाहेब जाधव, कायदेशीर प्रमुख ॲड.चंद्रशेखर शेळके, महिला आघाडी प्रमुख वनिताताई जाधव, महिला आघाडी राहुरी शहर प्रमुख साळे श्रावणी, दे.प्र.शहर मा.प्र. वसंत कदम, बाळासाहेब कदम, बापुसाहेब काळे, ३२ गाव शिवदूत प्रमुख दादासाहेब खाडे, उप ता.प्रमुख अनिल आढाव, ज्ञानेश्वर सप्रे, सुनिल खपके, विधानसभा प्र.अरुण जाधव, विभाग प्र.विजय आढाव, ता.सहसंघटक ज्ञानेश्वर धसाळ, मिलिंद हरिश्चंद्रे, जाधव भानुदास, गोरक्षनाथ सिन्नरकर, सरोदे संतोष, अजित ससाणे, अशोक शेळके, आशुतोष शिंदे आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन रोहित नालकर व महेंद्र शेळके यांनी केले तर सूत्रसंचालन महेंद्र उगले यांनी केले.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button