अहमदनगर

केंदळ येथील रस्त्याचे भुमिपुजन

राहुरी | अशोक मंडलिक : तालुक्यातील केंदळ बु येथील आरोग्य केंद्र ते शामराव तारडे वस्ती या रस्त्याच्या ४५ लाख रुपये खर्चाच्या खडीकरण करण्याच्या कामाचे भुमिपुजन आ. प्राजक्त तनपुरे यांचे हस्ते करण्यात आले.

यावेळी आ. तनपुरे म्हणाले की, महाविकास आघाडी सरकार असतांना मतदार संघातील ग्रामिण भागाच्या रस्त्यांसाठी कोट्यावधी रुपयांचा निधी मंजुर केला होता, परंतु राज्यात सत्तांतर होताच आलेल्या विद्यमान सरकारने मंजुर झालेल्या या सर्व विकास कामांना स्थगिती दिली.

यावर लोक प्रतिनीधी म्हणुन मी संबधीत सरकारला विनंती केली की, हि मंजुर झालेली कामे ग्रामिण भागातील असुन तेथील रस्त्यांची अवस्था दयनीय आहे. यासाठी स्थगिती उठविणे आवश्यक आहे. परंतु याची शासनाने कुठलीही दखल घेतली नाही. यानंतर या महत्वाच्या प्रश्नावर शासनाचे लक्ष वेधण्याकरीता मतदार संघात ग्रामस्थांसह सायकल रँली काढली. तरीही शासन बदलले नाही. म्हणुन नाईलाजाने न्यायालयाचे दरवाजे ठोठावे लागले. न्यायालयाला या कामाचे महत्व पटल्याने हि स्थगिती उठविण्याचे आदेश न्यायालयाने राज्य शासनास दिले.

या न्यायालयीन आदेशाची अंमलबजावणी करण्याकरीता मी पुन्हा सर्व संबंधितांना विनंती केली. परंतू तरीही कार्यवाही होत नसल्याने न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले नाही म्हणुन अवमान याचिका दाखल करण्याची नोटीस शासनास दिली होती. नंतर या बाबत तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश शासनाने दिले व त्यानुसार आज हे काम मार्गी लागत आहे याचे मला समाधान आहे असेही तनपुरे म्हणाले. यावेळी मा.सरपंच अरुण डोंगरे यांनी मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे मा.अध्यक्ष बाबासाहेब भिटे, केंदळ बु चे सरपंच गोविंद जाधव, उपसरपंच लक्ष्मण तारडे, आसाराम तारडे, विष्णु तारडे, नामदेव तारडे, गोरक्षनाथ तारडे, आण्णसाहेब देवरे, अविनाश हरिश्चंद्रे, प्रल्हाद तारडे, सदाशिव तारडे, विजय चव्हाण, सुदाम तारडे, राजेंद्र तारडे, सुरेश तारडे, अमोल तारडे, अरुण डोंगरे, कानिफनाथ तारडे, भिमराज चव्हाण, ग्रामसेविका श्रीमती भिसे, सोसायटी सचिव लक्ष्मण गोसावी आदी उपस्थित होते.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button